कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांपैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह
शहापुर : शहापुरातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांपैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याना क्वारटाइन करण्यात आले होते. उर्वरित सात जणांचे अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. शहापूरात एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचे शुक्रवारी आढळून आले असून त्याच्यावर ठाणे येथील होराईझन या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना क्वारोंटाईन करून भिवंडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या ११ जणांपैकी चार जणांची केलेली चाचणी निगेटिव्ह आली असून उर्वरित सात जणांच्या चाचणीचे अहवाल बुधवारी प्राप्त होतील अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी दिली.