शासनाच्या मोफत धान्य योजनेचे वाड्यात वाटप शेवटच्या घटकापर्यंत धान्य पोहचविण्याचा तहसीलदारांचा प्रयत्न
वाडा : सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचे पयत्न शासनाच्या वतीने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील शहरी तसेच गामीण भागात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य योजनेचे वाटप सुरू करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी पारदर्शक कारभारासाठी तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे काम सुरू असून कोणत्याही प्रकारे अपहार होवु नये यासाठी संबंधित दुकानदारांना सुचना देऊन सदरचे अन्न धान्य हे शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचा या मागचा हेतू आहे. शिधा पत्रिकेतील प्रत्येक सदस्यास ५ किलो तांदूळ मोफत यात अंत्योदय कार्डधारक, बी.पी.एल. कार्डधारक या कार्ड धारकांसाठी ही मोफत तांदूळ वाटप योजना असून याच कार्ड धारकांसाठी ३ रुपये प्रति किलो दराने तांदळ तर २ रूपये प्रति किलो दराने गहू ही योजना देखील सुरू आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना बसू नये यासाठी शासनाचे पयत्न सुरू असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यात सुमारे ९ हजार ७५५ अंत्योदय कार्ड धारक असून प्राधान्य कार्ड धारक १७ हजार २३१ कार्ड धारकांना ८५ टक्के धान्य वाटप करण्यात आले असून मोफत धान्य योजने अंतर्गत ७० टक्के कार्ड धारकांना तांदळाचे वाटप झाले असून हे वाटप रास्त भाव धान्य दुकानावर सकाळी ८ ते रात्री ८ वाजे पर्यंत गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत दुकानदारांनकडून सुरू असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.