थ्रोट स्वप चाचणी सरसकट फकट करण्याची मनसेचे मागणी
ठाणे : संपूर्ण देशात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे, ठाणे शहरातही काहीरुग्ण हे कोरोनाबाधित आढळले असून काही नागरिकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे. घसादुखीची (थ्रोट स्वप) चाचणी केल्यानंतर या आजाराचे निदान केले जात आहे. बहुतेक नागरिकांना कोरोना व्हायरस ची लक्षणं दिसून येत नाहीत (सायलेंट कॅरियर्स ) म्हणतात त्याला पण त्याची चाचणी केल्यानंतरच रिपोर्ट मध्य पासिटीव्ह दिसून येत आहेत. मध्ये पॉसिटीव्ह दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी मोठ्या चॅनेल च्या पत्रकारांना कोरोना ची लागण झाली त्यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली न्हवती मात्र त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना व्हायरस ची लागण झाल्याची निदर्शनास आले. त्यात ही चाचणी करण्याकरिता महापालिकेकडून ४५०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येत असून सद्यस्थीतीत नागरिकांना ही बाब परवडणारी नसून शासनाच्या धोरणानुसार ही चाचणी महापालिकेने मोफत करावी अशी मागणी मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावड प्रदीप सावर्डेकर यांनी महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल साहेब यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून कळविले आहे." सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसाधारण रुग्ण हा सर्दीखोकला या आजारांनी त्रस्त असून यावर उपचार घेवून सुध्दा सदरचा आजार बरा होत नसल्याने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले, मनातील शंका दूर करण्यासाठी काही नागरिक स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत असून ते थ्रोट स्वॅप चाचणी करण्याकरिता महापालिकेच्या आरोग्यकेंद्रात गेले असता, या चाचणीसाठी ४५०० इतके शुल्क भरावे लागेल असे त्यांना सांगण्यात येत आहे. सद्यस्थीतीत सर्व नागरिक घरी असताना त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे थ्रोट स्वप चाचणीसाठी आकारण्यात येणारे ४५०० रुपये एवढे शुल्क भरणे या नागरिकांना परवडणारे नसल्याने या चाचणीचा खर्च महापालिकेने करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.त्यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना थ्रोट स्वप चाचणी महापालिकेतर्फे मोफत करण्यात यावी अशी मागणी मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावर्डेकर यांनी केली आहे.