आमदार किसन कथोरेंची कातकरी आदिवाशी बांधवाना भरीव मदत
__ मुरबाड : कोरोना आजारामुळे राज्यात २१मार्च पासून सुरू झालेले लॉक डाऊन यामुळे कातकरी, आदिवाशी बांधवांची उपास मार होऊ नये यासाठी मतदारसंघातील आदिवासी, कातकरी व गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक ४७ हजार ३४७ किटचे वाटप आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. तसेच मतदारसंघातील गरीब गरजूंना मोफत जेवण दुरु केले आहे आतापर्यत पन्नास हजारहून अधिक नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. तर कोरोना आजाराची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मतदारसंघात ४५ हजार ६३५ माक्स व सॅनिटायझर च्या किटचे वाटप केले आहे, भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेली २० दिवस हे कार्य सतत सुरू आहे. किसन कथोरे चे खन्दे समर्थक साकीब गोरे यांनी तर कोरोना गो चा नारा देत मुरबाड विधानसभा मतदारसंघातील गरीब आणि गरज आदिवशी कातकरी, बांधवाना जीवनावश्यक वस्तचा परव समाजसेवेचा वसा निरंतन सुरू ठेवला आहे.