खर्डीत लॉकडाऊनचे तीन तेरा

खर्डी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाउन आहे.याच पार्श्वभूमीवर खर्डीत रोज सकाळी ८ ते २ दरम्यान अत्यावश्यक सेवेची सर्वच दुकाने उघड़त असल्याने परिसरातील खेडयापाड्यातुन मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी येत असल्याने गर्दी होत आहे.त्यामुळे शासनाने दिलेले कोणतेही आदेश न पाळता व सोशियल डिस्टनिंग न ठेवता खरेदी-विक्री करण्यात येत असल्याने कोरोनाचा प्रादर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून खर्डीतील आपत्ती व्यवस्थापन कमीटी व ग्रामपंचायतच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून लोक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. खर्डीत ३ कोरोना संशयित रुग्णाना होमक्वारंटाइन करण्यात आले असून सुद्धा स्थानिक नागरिक कोरोना बाबत खबरदारी घेत नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे.ग्रापं मार्फत स्पीकर द्वारे वारंवार सूचना करून सुद्धा बाजारातील लोक सूचनांचे पालन करतांना दिसत नाही व ग्रापं कोणावरही कारवाई करायला धजावत नाही त्यामुळे व्यापारी व ग्राहक कोणालाही जुमानत नसल्याने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाची महसूल व पोलिसामार्फत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...