कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात चार ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा
टिटवाळा : कोरोना व्हयरस च्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे, यास्थितीत ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारी कुटुंब, तसेच अन्य गोरगरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी कल्याण तहसीलदार कार्यालय आणि सामजिक संस्थानच्या मदतीने चार ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध केली आहे, दररोज या ठिकाणी पाच हजाराहून अधिक नागरिक या भोजनाचा लाभ घेत आहेत, तहसीलदार दीपक आकडे आणि त्यांची महसूल विभागाच्या सर्व टीम कार्यात वेस्थ आहे. ग्रामीण भागात म्हा र ळ , कांबा, गोवेली खंडवली येथे ही मोफत भोजन सुविधा उपलब्ध केली आहे, सर्व केंद्राचा दररोज आढावा तहसीलदार दीपक आकडे घेत आहेतत्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लॉक डाऊन च्या काळात समाधान वेक्त करत आहेत. तालुक्यातील रेशनिंग दुकानादारांनी देखील कोरोना आजाराच्या काळात धान्य वाटप करताना गरजू गरिबांना मदतीचा हात दिला आहे, मामनोली, दहागाव, वाहोली, रायते, म्हसकल, घोटसईयेथील रेशनिंग दुकानदारांनी कार्ड धारक नसलेले, तसेच पिवळी शिधापत्रिका असून धान्य न मिळणाऱ्या गरजूंना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. तसेच लोकप्रतिनिधी व स्थानिक संस्थांच्या मदतीने आदिवाशी, कातकरी वस्तीना जीवनावश्यक वस्त पुरवठा केला जात आहे.