रेशन दुकानांत रेशनचा काळाबाजार; नागरिकांच्या असंख्य तक्रारी
कल्याण : केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत शिधावाटप दुकानांत मिळणारा मोफत शिधा ; गहू, तांदूळ, डाळ म्हारल, पो.वरप, ता. कल्याण, (जि.ठाणे) मध्ये दुकान क्रमांक : ४० फ २९९ व ४० फ १८४ सहायक शिधावाटप अधिकारी, ४० फ उपनियंत्रक (उल्हासनगर) येथे केशरी कार्ड धारकांना थातुरमातुर कारणे सांगून दिला जात नसल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. उदा. स्टॉक संपला पुढच्या महिन्यात या.., आधार कार्ड मागितले जाते परंतु तम्ही शिधावाटप कार्यालयात रजिस्टर्ड नसल्याचे सांगितले जात आहे. दुकानात आलेला शिधा केशरी कार्ड धारकांना दिला जात नसून तो काळ्याबाजारात विकला जात आहे. सहायक शिधावाटप अधिकारी, ४० फ एम उपनियंत्रक (उल्हासनगर) डी वी बोरकर आणि ४० फ (सब) सानप यांचा मोबाईल फ्री क्र १८००२२४९५० नेहमीच busy येत आहे. शासनाने याची युद्धपातळीवर दखल घेऊन या शिधावाटप दुकानांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून कोणत्या निकषांवर, आतापर्यंत प्रत्यक्षात किती जणांना मोफत शिधा दिला गेला? अनियमितता आणि शिधावाटपातील भ्रष्टाचार शोधून काढावा तसेच दोषी आढळल्यास परवाना रद्द केला जावा. नागरिक मांगणी करीत आहेत की केंद्र शासनाचा मोफत शिधा वाटपाचे काम शिधावाटप दुकानांना न देता एन.जी.ओ. ना दिले जावे.