लॉकडाऊनमुळे बंद कंपन्यांचे पाणी जाते कुठे?
रहिवासी भागाला पुरेसा पाणी पुरवठा करा अंबरनाथला मनसेची पाणी खात्याकडे मागणी
अंबरनाथ : लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अंबरनाथच्या औद्योगिक विभागातील कंपन्या बंद असल्याने त्यांचा पाणीपुरवठा जातो कुठे असा सवाल उपस्थित करून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या रहिवासी भागाला पुरेसे पाणी पुरवठा करा अशी मागणी अंबरनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहर संघटक आणि माजी नगरसेवक स्वप्निल बागुल यांनी पाणी खात्याच्या अधिकाऱ्याकडे केली. अंबरनाथच्या वडवली आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरु असल्याने एमआयडीसीकडून नियमित सुरु असलेला पाणीपुरवठा १७ मार्चपासून एक दिवसाआड केला जात आहे, कोरोनामुळे लॉकडाऊन स्थितीमध्ये औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखाने बंद आहेत. या बंद कारखान्यांचे पाणी जाते कुठे , असा प्रश्न उपस्थित करून रहिवासी भागाला पुरवावे अशी मागनी करणारे निवेदन श्री. बागुल यांनी पाणीखात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपशहर संघटक प्रशांत नलावडे उपस्थित होते.