वाड्यात संचारबंदी चे तीनतेरा
वाडा : करोनाच्या पाश्र्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांची गर्दी थोपविण्यासाठी प्रशासनाकडून ही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागातील भागातील नागरीकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने वाडा शहरात संचारबंदीचे तीन तेरा वाजले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून निराधार व वयोवृद्धांना संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ अशा विविध योजनांतर्गत दरमहा एक हजार रुपये दिले जातात. हे पैसै लाभार्थ्यांचे ज्या बँकांमध्ये खाते आहे त्या ठिकाणी जमा होत असतात. ___ वाडा तालुक्यात विशेषत: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येथील बहुतांशी लाभार्थ्यांची खाते असलेल्याने तालुक्यात या बँकेच्या शाखा असलेल्या वाडा. खानिवली, कुडूस व कंचाड या शाखांसमोर लाभार्थ्यांची गेल्या चार दिवसांपासन मोठ्या प्रमाणात गर्दी दिसन येत आहे. वाडा शहरातील ठाणे जिल्हा बँकसमोर आज बुधवारी (१५ एप्रिल ) निराधार योजनेतील पैसे काढण्यासाठी पाचशेहून अधिक वयोवृद्ध लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टीगिंग न करता ही गर्दी झाल्याने करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेचे तिनं तेरा वाजल्याचे दिसून आले. या निराधार लाभार्थ्यांच्या गर्दीमध्ये किसान सन्मान योजना तसेच बँकेचे अन्य व्यवहार करणाऱ्या खातेदारांचीही भर पडल्याने संचारबंदीमध्येही येथे माणसांचा मोठा बाजार भरलेला दिसून येत होता. वाडा शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँक या ठिकाणीही तुरळक गर्दी दिसून येत होती.