मुरबाड पोलीस ठाणे झाले सॅनिटायजरींग

मुरबाड : लॉक डाऊन मधे स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र ड्यूटी करणारे महाराष्ट्र पोलीसांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये. त्यांच्या आरोग्याची सूद्धा काळजी घेतली पाहीजे म्हणून मुरबाड मधील श्री बाळाजी इंटरप्रायजेस यांनी मुरबाड पोलीसांच्या सुरक्षिततेसाठी ॲटोमेटीक सॅनिटायझर युनिट स्व:ताच्या खर्चाने मुरबाड पोलीसस्टेशनच्या प्रवेश द्वारावर बसविण्यात आले आहे. या मुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यात येणारा प्रत्येक नागरिक सूद्धा सॅनिटायजरींग होणार आहे. . यावेळी उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरिक्षक दत्तात्रय बोराटे, गोपनीय विभागाचे विनायक खेडकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बाळाजी इंटरप्रायजेस चे या वेळी मुरबाड पोलीसांकडून आभार व्यक्त करण्यात आले. CENTRY


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...