मुरबाड तहसिल कार्यालयात बसवलेला नवीन टनेल बंद
मुरबाड : कोरोना पासून बचाव करण्यासाठी मुरबाड तहसिल कार्यालयात येणाऱ्या लोकांचे निर्जंतुकी करणं करण्यासाठी मंगळवारी (ता.२१) बसविण्यात आलेला रासायनिक फवारणी करणारा टनेल दुसऱ्याच दिवशी बुधवारी ता २२ पासून बंद करण्यात आला आहे. या टनेल मधून फवारलेल्या रसायना मुळे लोकांच्या कपड्याला डाग पडत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने थेट मानवी शरीरावर रासायनिक पदार्थांचा मारा करणे धोकादायक असल्याने अशी रसायने टनेल मधन लोकांच्या अंगावर फवारणी करणे धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर बसवलेल्या टनेल मध्ये रसायन भरणे बंद केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुरबाड पोलीस ठाणे व मुरबाड नगर पंचायत कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर लोकांच्या अंगावर रसायने फवारणी करण्यासाठी बसवलेले टनेल मात्र अजून चालू आहेत