पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकल ट्रेन ने प्रवास करण्याकरिता QR coad मिळण्यासाठीची कार्यवाही     

इमेज
 ठाणे :   अधिकारी व कर्मचारी यांची यादी पोलीस आयुक्त कार्यालय येथे जमा करण्यात आली आहे. येत्या ३ ते ४ दिवसात सर्वाना त्यांच्या मोबाईल वर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून एक SMS येईल. त्या SMS मध्ये एक link दिलेली असेल ती प्रत्येकाने Open करून त्यामध्ये दिलेल्या नमुन्यामध्ये स्वतः ची सर्व माहिती भरून व passport size चे छायाचित्र upload करून त्या Link वर Submit करायची आहे.  परिपूर्ण माहिती भरून Submit केल्यानंतर पुन्हा एक दिवसांनी आपणास पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत SMS द्वारे QR code कळविण्यात येईल. कृपया या Group वर नसलेल्या परंतु या Group मधील सदस्यांच्या संपर्कात असलेल्या इतर अधिकारी/कर्मचारी यांना देखील उक्त SMS बाबत अवगत करावे अशी माहिती रविंद्र जगदाळे नोडल ऑफीसर यांनी दिली आहे.

कळंभे हद्दीत ठक्कर कंपाऊंड शेजारी कचऱ्याचे ढीग ; रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात 

इमेज
आसनगाव : शहापुर तालुक्यातुन  जाणाऱ्या  मुबंई-नासिक महामार्गालगत अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याची ओरड कित्येक  वर्षा पासून आहे. त्यातच महामार्गालगत कळंभे  गावाच्या हद्दीत ठक्कर कंपाऊंड शेजारी  कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवून कचरा हटविण्यासाठी लेखी मागणी ठक्कर कपाऊंड  व विकास मंडळ गुजराथी बाग रहिवासी संघाने ग्रामविकास अधिकारी  ग्रुप ग्रामपंचायत बोरशेती-कळभे यांच्याकडे केली आहे.  मुबंई-नासिक महामार्गालगत शहापुर तालुक्यातील अनेक हद्दीत ओला व सुका कचरा टाकला जात असल्याची समस्या कित्येक वर्षांपासून आहे.  मात्र याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने  परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची ओरड नेहमीच होते. त्यातच सध्या कोरोनाचे थैमान सुरू असतांनाच   महामार्गालगत कळंभे हद्दीतील ठक्कर कंपाउंड शेजारी  कचऱ्याचे ढीग साचल्याने ह्या भागात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा आरोप वजा तक्रार रहिवाशी संघाने ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदना...

खोडाळा - विहीगाव रस्ता झाडा  झुडपामुळे धोकादायक ; रस्त्यांवर  दरडी कोसळण्याच्या भिती ...

इमेज
कसारा : मोखाडा  तालुक्‍यातील खोडाळा -विहीगाव   जोडणाऱ्या  रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे  रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरीकांमधून होत आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी खोडाळा- विहीगाव  घाटात झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसून येत नाही. या भागातील कारेगाव आश्रम शाळा  जवळ रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडुपे वाढल्यामुळे वाहन चालवताना पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहन चालकांची फसगत होते.मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.  खोडाळा रस्त्यांवर  असणाऱ्या कारेगाव,वाकडपाडा,उधळे जोगलवाडी यांना मोखाडा  येथे ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तर विहीगाव जवळील अशोका धबधबा पाहण्यासाठी , पर्यटक  या ठिकाणी सतत येत असतात. या घाट रस्त्यावर असलेली काटेरी झुडपांमुळे येथे अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या परीसरातील झाडे झुडुपे काढून टाकण्याची मागणी , प्रवाशांमधून होत आहे. या रस्त्यावरुन नियमित प्रवास करतो. या रस्त्यावरील धोकादाय...

गीता माध्यमिक विद्यालय विहिगाव शाळेचा १०० टक्के निकाल ....  

इमेज
कसारा : अतुल्य स्पोर्ट्स फाऊंडेशन हि संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा व शैक्षणिक विकासासाठी कार्य करते. या संस्थेमध्येच मल्लखांबाचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी क्रीडा क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात गीता माध्यमिक विद्यालय विहिगाव येथे शिक्षण घेणाऱ्या जालना आमले (७८.६०%)प्रथम क्रमांक व देविदास  कामडी(७६%) द्वितीय क्रमांक पटकावत १० वीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी मिळविलेले हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.          अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच वर्षी गुजरात (अहमदाबाद) येथे झालेल्या राष्ट्रीय एरियल सिल्क स्पर्धेत देविदास कामडी याने वैयक्तिक सुवर्ण,देविदास कामडी व जालना आमले यांनी (मिश्र दुहेरी) महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतांना सुवर्ण पदक पटकावले होते. या मुलांनी आपल्या मेहनत व जिद्दीने घेतलेल्या या अवकाश भरारीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.लक्ष पुर्ण झाले नसले तरी मिळालेल्या गुणांमध्ये समाधानी असल्याचे देविदास सांगतो...

ठाणे जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतीची निवडणूक बिनविरोध

इमेज
ठाणे : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची निवड झाली. तसेच उर्वरित दोन विशेष समित्यांच्या सभापतीपदी कुंदन पाटील आणि संजय निमसे यांची निवड झाली. या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) तथा सदस्य सचिव छायादेवी सिसोदे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. आज गोयंका इंटरनॅशनल स्कुल येथे कोव्हिडं १९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडणूका संपन्न झाल्या. विजयी उमेदवारांचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांनी अभिनंदन केले. महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी विराजमान झालेल्या रत्नप्रभा तारमळे ( शिवसेना)  या खारबाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.तर समाज कल्याण सभापती पदी विराजमान झालेल्या ...

रुद्र प्रतिष्ठानचे वतीने सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर बसले जाणार सॅनिटायझर स्टॅन्ड 

इमेज
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य,सावरकर नगर प्रभाग समिती मधील प्रभाग क्र. १४ मध्ये रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह यांच्या संस्थेच्या साहाय्याने सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर सॅनिटायझर स्टॅन्ड बसवण्यासाठीची संकल्पना शिवसेना गटनेते स्थानिक, नगरसेवक दिलीप चद्रकांत बारटक्के यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त बिपीन शर्मा, उपयुक्त अशोक बुरकुले, आरोग्य विभाग अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व हलदेकर, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली व लोकमान्य, सावरकरनगर प्रभाग समिती मधील प्रभाग क्र.१४ मध्ये  सार्वजनिक शौचालयाच्या  ठिकाणी बाहेर सॅनिटायजर स्टॅन्ड बसवण्यासाठीच्या संकल्पनेला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.   या संकल्पनेमुळे शौचालयत जाणारी प्रत्येक व्यक्ती आत जाताना किंवा बाहेर येताना सॅनिटायझर करून हात स्वच्छ करतील त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास आळा बसेल. यावेळी लोकमान्य प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त ससाणे, चारुशीला पंडित उपस्थित होते.

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जप्त केला बनावट मास्कचा साठा

इमेज
ठाणे - ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी व्हीनस कंपनीच्या बनावट मास्कचा साठा जप्त करून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन व्हीनस कंपनीचे बनावट मास्क विकले जात असल्याची माहिती पोलीस निरिक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून लोअर परळ इथे एक व्यक्ती बनावट मास्कची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं समजले.  त्यानुसार सापळा रचून पोलीसांनी टेम्पोतून आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीत व्हीनस कंपनीचे साडेहजार एन ९५ बनावट मास्क, व्हॉल्व्ह असलेले व्ही ४१० व्ही चे ६,८०० मास्क आणि प्लास्टीकचे रिकामे पाऊच १० हजार असा एकूण २१ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. व्हीनस कंपनीच्या अधिका-यांनी मास्कची तपासणी केली असता ते बनावट असल्याचं निष्पन्न झालं. जप्त केलेले मास्क हे निकृष्ट दर्जाचे असून अशाप्रकारचे मास्क वापरणे आरोग्यास धोकादायक आहे. कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारचे बनावट मास्क अजून कोठे विक्री केले जात आहेत याचा तपास पोलीस करत...

शहापुर तालुक्यातील चैतन्य विद्यालय गुंडे शाळेचा १०० टक्के निकाल.

इमेज
डोळखांब : ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था वाडा संचलित चैतन्य विद्यालय गुंडे शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.दहावीमधील प्रज्ञा धनाजी गायकवाड व पल्लवी सदाशिव चौधरी या दोन्ही विद्यार्थिनींनी ९०.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.सचिन लक्ष्मण करवाळे याने द्वितीय क्रमांकाचा मानकरी होत ९०.४० टक्के गुण मिळवले आहेत तर ८८.२० टक्के गुण मिळवत दीपाली दत्तात्रय विशे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.तीनही विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.  यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचं अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.हे विद्यालय अतिदुर्गम भागात असल्याने ग्रामीण जिवनमानामुळे येथील विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो.मात्र विद्यार्थ्यांना समस्या सोडवून त्यांना काहीतरी अधिक मिळालं पाहिजे या निर्मळ भावनेतून  येथील सर्व शिक्षक झटत असतात.आमचं विद्यालय ग्रामीण भागात असलं तरी गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहीलं आहे,यापुढेही विद्यालय...

कल्याण - डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील तापाचा दवाखाना जोंधळे महाविद्यालयात स्थलांतरीत

इमेज
कल्याण : शास्त्रीनगर रुग्णालयात असणारा महानगरपालिकेचा तापाचा दवाखाना ( फिवर क्लिनिक ) दिनांक २९ जुलै २०२० पासून जोंधळे महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासना तर्फे देण्यात आली आहे . महानगरपालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणुन घोषित केल्यापासुन या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे .त्यामुळे हा तापाचा दवाखाना जोंधळे महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे फिवर ओपीडी मधून आलेल्या संश यित कोविड रुग्णांची जोंधळे महाविद्यालयात विनामुल्य अँन्टिजेन टेस्ट देखील करण्यात येणार असल्याची माहितीही महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे .

मुरबाड तालुक्यात टोमॅटोची शेती फुलली श्रीगणेशाच्या मुख दर्शनाने 

इमेज
  मुरबाड : तालुक्यातील विढे ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या मालकीच्या जागेमध्ये  टोमॅटोची शेती लावणारे शेतकरी  संजय आत्माराम गायकवाड यांनी पावसाच्या आगमनाच्या सुरुवातीलाच विविध भाजीपाल्या सह भेंडी ,काकडी, फुलवर ,घोसाळी , मिरची दोन एकर क्षेत्रफळापैकी एक एकर क्षेत्रफळा मध्ये टोमॅटो या रोपाची लागवड आपले साथीदार वसंत मारुती सोनवणे , दिलीप भगवान धुमाळ शिवळे, तसेच गणपत उर्फ बाप्पा चौधरी विढे गाव यांच्या सहकार्याने टोमॅटोची शेती फुलवली आहे.  परिसरामध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे त्यातच आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांची ही टोमॅटोची शेती निसर्गाच्या विविध रंगानी पाने फुलांनी नटलेली असतानाच टोमॅटो या फळांमध्ये साक्षात श्रीगणेशाचे दर्शन घडून आले त्यामुळे परिसरात गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. श्रावण महिन्यात  लवकरच श्री गणेशाचे आगमन होणार असल्याने जगावरील व आपल्या देशावर आलेले  कोरोना विषाणूचे   महासंकट  दूर होण्याचे संकेत या टोमॅटो गणेश प्रतिकृती मधून दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील वारकरी संप्रदाय व गणेश भक्तांमध...

माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहीर ! यंदाही मुलींची बाजी!

इमेज
मुरबाड - मार्च  २०२० रोजी घेण्यात आलेल्या माध्यमिक  शालांत परिक्षेचा  (SSC)   ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यामध्ये मुरबाड तालुक्याचा निकाल ९५ .९३ % लागला आहे या निकालामध्ये सर्वात जास्त मुलींनी बाजी मारल्याचे चित्र  दिसून येत आहे.तालुक्यात सेमी इंग्रजी माध्यमातून प्रथम येण्याचा मान सौ निर्मला बळीराम तोंडलीकर कर विद्यालयाची जिज्ञासा जयवंत  हरड हिने ९६ . ६० % गुण मिळवुन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर इंग्रजी माध्यमातून  एस.व्ही शेट्टी इंग्लीश मेडीयम स्कूल किशोर  शाळेची तेजस्वीनी संतोष भोईर हिला ९६% गुण मिळवुन  प्रथम आली असल्याने दोघींचेही तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे.  निर्मला बळीराम तोंडलीकर  विद्यालयाच्या सेमी माध्यमातून द्वितीय क्रमांक साहिल वालिंबे ९५ .२० % तर तृतीय क्रमांक योगिता पाटील ९४ % २० ,तसेच सौ निर्मला बळीराम तोंडलीकर  विद्यालयाचा एकूण  निकाल ९९ % १२ लागला आहे. त्या पाठोपाठ विद्या मंदिर हायस्कूल शिवळेचा निकाल ९७ . २० %  लागला आहे. जिद्नासा ने मिळविलेल्या तीच्या या यशाचे श्रेय तिने त...

पवन पाटील  यांची गणिताच्या राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर पदी निवड...

इमेज
आसनगाव :   शहापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गोकुळगाव येथील माध्यमिक शिक्षक पवन  भगवान पाटील  यांची गणित विषयाच्या राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर पदी निवड झाली आहे. तर विशेष म्हणजे ठाणे जिल्हातुन ४५० शिक्षकांमधून  सहा शिक्षकाची निवड करण्यात आली असून  पवन पाटील यांचा सहामध्ये समावेश असल्यामुळे सर्वस्तरातुन पवन पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषयाचे राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षणासाठी १४ जुलै २०१८ रोजी ठाणे जिल्हातुन ४५०  शिक्षकांनी परिक्षा दिली होती.  त्यापैकी  ठाणे जिल्ह्यातून सहा शिक्षकाची निवड करण्यात आली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातून या प्रशिक्षणासाठी २५० शिक्षकांची निवड झाली आहे.   ह्या गणित विषयाचे राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे दोन वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. त्यानंतर सहा जुलै २०२०  ला  झालेल्या अंतिम परीक्षेत  पवन भगवान पाटील यांनी यश मिळवले. व त्या...

शहापुर तालुक्यात महावितरणला १५ कोटीच्या थकबाकीचा शॉक ....

इमेज
आसनगाव : शहापूर तालुक्यात महावितरणच्या  ७८ हजार ३८२  विजग्राहकांपैकी अवघ्या १९ हजार वीज ग्राहकांनी वीज बिल भरले आहे. त्यामुळे  १५ कोटीच्या थकबाकीचा शॉक महावितरणला ग्राहकांनी दिला आहे. दरम्यान उर्वरित थकबाकीदार ग्राहकांनी लवकरात लवकर वीज बिल भरुन कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे शहापुर उपविभागीय उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी केले आहे.  तालुक्यात ६९ हजार घरगुती, ७ हजार व्यवसायिक,१३३० शेती, ८३० छोटे कंपनीधारक तर ५००  मोठे कंपनीधारक असे एकूण ७८ हजार ६६० वीज ग्राहक आहेत.ह्या एकूण ग्राहकांपैकी अवघ्या १९ हजार विज ग्राहकांनी वीजबिल भरले असून ५९ हजार ६६० विजग्राहकांनी वीज बिल न भरल्याने बिलाची थकबाकी १५ कोटींच्या घरांत गेल्याने ग्राहकांच्या थकबाकीचा शॉक महावितरणला बसला आहे.   तसेच विशेष म्हणजे तालुक्यातील घरांची संख्या आणि वीज जोडणीची संख्या यामध्ये १० हजार  वीज जोडणीची तफावत आहे.तसेच तालुक्यात आकडे टाकुन वीजचोरीही होत असल्याची खंतही महावितरणच्याअधिकाऱ्यांनी माहिती देतांना व्यक्त केली.तर लॉकडाऊनमध्ये थकलेले वीजबिल ग्राहकांना हप्त्याने भर...

जीवरक्षक इंजेक्शनचा काळा  बाजार ..... 

इमेज
कल्याण : एकीकडे काही डॉक्टर कोरोना पासून वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाज़ी लावत असताना काही डॉक्टर मात्र लोकांना लूटायची सुवर्णसंधी म्हणुन या आजाराकडे पाहत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे . संशयीत कोविड रुग्णाच्या मृत्युप्रकरणी डॉक्टर आणि रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मुख्यमंत्री। उध्दव ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी दाद मागीतली आहे .तसेच संबंधित डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे .    कल्याण ( प )येथील काळा तलाव परीसरात राहणा-या जेष्ठ नागरीकाला २१ जुलै ला कल्याण ( प ) मधिल शिवम् हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते त्यांची कोविड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी सिटी स्कँनमध्ये त्यांना संसर्ग झाल्याचे शिवम् हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रूग्णाच्या नातेवाईकांना सांगितले .तसेच दुसर-या दिवशी सकाळी  रूग्णाची अॉक्सीजन लेव्हल कमी झाल्याचे सांगून २ इंजेक्शन आणण्यास सांगीतले . शिवम् हॉस्पिटलच्या ख़ाली असलेल्या मेडिकलमधून ही २ इंजेक्शन दुप्पट किंमतीत म्हणजेच  १ लाख २० हज़ार रूपयांना खरेदी  क...

"मी महाराष्ट्राचा .... महाराष्ट्र माझा.... "

इमेज
  तसं ‘ठाकरे’ या आडनावातच जादूआहेम्हणा! या कु टुंबात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती हा जहाल मतवादी प्रकारातला स्पष्टवक्ता राहहलाय. मग तेप्रबोधन ठाकरे असो, बाळासाहेब ठाकरेवा आजचेराज ठाकरे, पण या सवाांपुढेउद्धवसाहेब अहतशय हमतभाषीच वाटतात. तरीही स्पष्टमतवादीपणा हा रक्ताचाच गुणधर्म आहे म्हणा.  लीडर कुणाला म्हणावं? तर “जेंव्हा तुम्ही जबाबदारी घेण्यास पात्र ठरता, त्यावेळी तुमच्यात समजूतदारपणा आहण कल्पक नेतृत्व हेगुण असायलाच हवेत! नाहीतर शासन आलं म्हणून जर शासक झालात, तर जनतेचं प्रेम तुम्हांला कधीही हमळूशकणार नाही. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा, गरजा यांचा कधीही थांगपत्ता लागणार नाही”. हे शब्द आहेत एका महान लीडरचे.कुणी कुणाला समजून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी, मी माझ्या लोकांना समजून घेतलंच पाहिजे ज्यांच्या आर्शिवादाने आज मी या महाराष्ट्राच्या ‘कुटुंबप्रमुख’ या गादीवर बसलो आहे. तेही ना शाखाप्रमुख, ना नगरसेवक, ना आमदार, तर थेट मुख्यमंत्री. का? तर सहकारी म्हणवणारांच्या आडमुठी धोरणामुळे. कदाचित त्याचमुळे आजच्या महाराष्ट्राच्या आडमुठे राजकारणात महाभारतचं कलुषित राजकारणच प्रतिबिंबित...

'मदर इंडिया' चित्रपटातील जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे ८६व्या वर्षी  निधन... 

इमेज
 'मिस्टर एक्स इन बॉम्बे', 'मदर इंडिया', 'सन ऑफ  इंडिया ' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. कुमकुम यांच्या निधनाची बातमी नावेद जाफरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे.  वाईट गोष्ट म्हणजे २०२० साली बॉलिवूडने अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, जगदीप आणि आता  अभिनेत्री कुमकुम यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. कुमकुम यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्यांचे अनेक चित्रपट हीट देखील झाले आहे. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

जीवनसाथी निवडताय ....! मग हे नक्की वाचा 

इमेज
सध्याच्या तांत्रिक युगात माणूस बरीच प्रगती करत आहे. अगदी गरजेच्या वस्तुंपासून ते आपल्या जीवनसाथीच्या शोधासाठी सर्वप्रथम सध्या काही वेबसाईटस बाजारात येत आहेत. त्यात काही डेटिंग अॅपसुद्धा आहेत. ज्यातून आपण आपला जीवनसाथी  निवडू शकतो मात्र जर अश्या डेटिंग अॅपवर परिपूर्ण जीवनसाथी शोधत असाल आणि मुलींना प्रभावित करण्यासाठी शर्टशिवाय पोस्ट करत असाल तर ही कृती उलटसुलट होऊ शकते. डेटिंग डॉट कॉमच्या नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, शर्टलेस फोटो पुरुषांना जोडीदार शोधणे कठीण करतात. साधारणपणे ९०% टक्के पुरुष असा विचार करतात की एखादा शॉर्टलेस फोटो पोस्ट केल्याने महिलांना आकर्षित करण्याची त्यांची शक्यता वाढते, परंतु त्याचा विपरीत परिणाम होतो. असे फोटो टाकल्यानंतर डेटिंग साइटवर चांगला पार्टनर मिळण्याची शक्यता २५ टक्क्यांनी कमी होते. सर्वेक्षण केलेल्या अर्ध्या महिला म्हणाल्या की असे फोटो पोस्ट करणे हे मुलाच्या नादानपणाचे लक्षण आहे. हे सर्वेक्षण दोन भागात केले गेले. पहिल्या २००० मध्ये कंपनीच्या डेटिंग अॅपच्या वापरकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यानंतर अ‍ॅपच्या वास्तविक डेटावरील त्यांच्या प्रति...

भारतात पहिल्यांदाच होणार iPhone 11 ची निर्मिती

इमेज
  अमेरिकन कंपनी ऍपल Apple भारतात पहिल्यांदा त्यांचं प्रमुख मॉडेल असणाऱ्या iPhone 11ची निर्मिती manufacturing iphone 11 करणार आहे. त्यासाठी चेन्नई येथे फॉक्सकॉन प्लांटमध्ये तयारी सुरु करण्यात आली आहे.  त्याशिवाय कंपनी iPhone SE 2020 हे मॉडेलही भारतात बनवण्याबाबत विचार करत आहे. हे मॉडेल भारतात बनल्यास ते बंगळुरु येथील विस्टर्न प्लांटमध्ये तयार केलं जाईल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ट्विट करत याबाबत घोषणा केली. 'Apple कंपनीच्या टॉप मॉडेलपैकी एक असणारा iPhone 11 भारतात बनणार आहे. मेक इन इंडियासाठी हे चांगले संकेत आहेत.' असं गोयल म्हणाले. 

सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट यांची तब्बल अडीच तास चौकशी 

इमेज
मुंबई : सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ४०  हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले आहेत. अगदी त्याच्या स्वयंपाकी कुक पासून ते बॉलीवूड मधल्या अनेक नामवंत कलाकारणचेही जबाब घेण्यात आले .. त्यात काही दिग्दर्शकांनाही चौकशी साठी सामोरे जावे लागले. मात्र बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आली. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी भट्ट यांची चौकशी केली.महेश भट्ट तसेच करण जोहरच्या मॅनेजरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स वांद्रे पोलिसांकडून बजाविण्यात आले होते. आवश्‍यकता भासल्यास करण जोहर याचीही पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  सिनेअभिनेत्री कंगणा राणावत हिच्या आरोपानंतर वांद्रे पोलिसांनी ही चौकशी सुरू केली आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात महेश भट्ट यांना बोलवल्यास या ठिकाणी प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची गर्दी होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे भट्ट यांना सांताक्रूझ पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यानुसार त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली. सुशा...

गणेशपुरीत जागतिक निसर्ग संरक्षण दिना निमित्त वृक्षारोपण व संकल्प

इमेज
  वज्रेश्वरी : २८ जुलै रोजी जागतिक निसर्ग संरक्षक दिनानिमित्त गणेशपुरी येथील संघर्ष प्रतिष्टानचे अध्यक्ष सुनिल देवरे यांनी त्यांच्या परिवारासह वृक्षारोपण केले.व निसर्ग संरक्षण चा संकल्प केला.  भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील संघर्ष प्रतिष्ठन या संस्थेच्या मार्फत  दरवर्षी पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण  केले जाते या वर्षी सुध्दा या संस्थे तर्फे निसर्ग संरक्षण व पर्यावरण समतोल राखण्या चा संकल्प करण्यात आला, आज जागतिक निसर्ग संरक्षण दिना निमित्ताने व या परिसरात वरुण राजाने चांगली हजेरी लावल्याने त्याचा सदुपयोग करून आज या परिवाराने वृक्षारोपण करून संकल्प केला आहे.    "निसर्गाचे रक्षण व्हावे आणि निसर्ग सुंदर व आरोग्यदायी व्हावा या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही पावसाळ्यात संघर्ष प्रतिष्ठान अंतर्गत ग्रीन अर्थ या प्रोजेक्ट च्या माध्यमातून २५९ वृक्षालागवडीचे लक्ष ठेवले असून ते आम्ही लवकरचं पूर्ण करणार आहोत अशी माहिती संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल देवरे व ग्रीन अर्थ प्रोजेक्ट हेड दीपक पूजारी यांनी यावेळी दिली.

टिटवाळा येथील नागरिकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व मोफत किराणा सामान वाटप 

इमेज
टिटवाळा:   २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष  विजय दशेकर व समाजकल्याण न्यासचे अध्यक्ष धर्मसेवक डॉ.सोन्यादादा पाटील यांच्या विशेष सहकार्याने मांडा टिटवाळा परीसरातील नागरीकांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण तसेच ६० महिलांना धान्य वाटप,अंकुर बालविकास केंद्र आणि आईची सावली ह्या अनाथाश्रमात शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेसाठी लागणारी भांडी वाटप करण्यात आली.   ह्यावेळी हातमाग महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) तथा जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण प्रकाशजी पाटील ,नवनिर्वाचित ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा(राज्यमंत्री दर्जा)  सुषमाताई लोणे,शिवसेना महिला भिवंडी लोकसभा संघटक कलाताई शिंदे,शिवसेना कल्याण महिला जिल्हा संघटक विजयाताई पोटे,आमदार शांतारामजी मोरे ,नगरसेवक सुनिलजी वायले, तालुका संपर्कप्रमुख विष्णुजी चंदे,उप-शहरप्रमुख कीशोरभाई शुक्ला,संभाजी ब्रिगेड महानगरप्रमुख प्रभाकरजी भोइर,छावा संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष अक्षयजी भोईर आणि शिवसेना महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते...

शहापुर तालुक्यामधील कोरोनाचा चढता आलेख उतरता उतरेना;कोविड सेंटर मध्ये रुग्णांची हेळसांड.

इमेज
डोळखांब: ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आपत्तीव्यवस्थापनाचा कोरोना आटोक्यात आल्याचा दावा खोटा ठरला आहे.तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण रुग्णसंख्या ७४५ वर पोहोचली आहे.तालुक्यातील वासिंद हे ठिकाण कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून वासींद मधील रोजची वाढणारी कोरोना बाधितांची संख्या नागरिकांच्या चिंतेचा कारण ठरत आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार दि.२८ जुलै रोजी नव्याने २५ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.शहापुर तालुक्यात आतापर्यंत ७४५ रुग्णांमधील ५२२ रुग्ण बरे झालेले आहेत.तसेच ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १९८ इतकी आहे.अलगीकरण कक्षातील व्यक्तींच्या संख्येत देखील दिवसेंदिवस बेसुमार वाढ होत आहे.शहापुर नगरपंचायत व शहापुर ग्रामीण मधील संस्थात्मक कोरोंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या १०९६ इतकी तर होम कोरोंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या २७९४ इतकी झाली असून एकूण संख्या ३८९० एवढी आहे.कोरोनामुळे आजवर शहापुर तालुक्यातील २५ व्यक्ती मृत पावल्या असून हा आकडा नक्कीच विचार करायला लावणारा आहे. शहापुर तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्य...

पाचपाखाडीत एक मोठं झाड उन्मळून पडलं

इमेज
ठाणे -  पांचपाखाडीतील अमृतसिध्दी सोसायटीच्या दुस-या मजल्यावर आणि जवळच्याच दोन दुकानांवर आज सकाळी एक मोठं झाड उन्मळून पडलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. पाचपाखाडीतील तळवलकर जिमच्या जवळ रस्त्याच्या मधोमध एक मोठं झाड उन्मळून पडलं. यामुळे पूर्ण रस्ता अडवला गेला तर समोरच्या असलेल्या अमृतसिध्दी सोसायटीच्या दुस-या मजल्यावर आणि महावीर पॉवर लाँड्री आणि सोनू कार्गो शॉपवर हे झाड पडलं.  दोन्ही दुकानांच्या छप्परांवर ते आल्यानं त्यांचं नुकसान झालं आहे. महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करून रस्ता मोकळा केला.              

शहापूरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी निवासी कुणबी समाज मंडळाचा पुढाकार...

इमेज
  आसनगाव: शहापुर तालुक्यात सध्या अनेक समस्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी शहापुर निवासी कुणबी समाज मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने त्यानी आमदार दौलत दरोडा यांची भेट घेऊन समस्यांबाबत लेेखी निवेदन दिले आहे. तर मतदारसंघातील असलेल्या धरणांमधून मिळणारा उपकर तालुक्यातील विकासकामांसाठी आणावा. व सदर उपकरातून नागरिकांची  देयके माफ करावीत अशीही मागणी शहापुर निवासी कुणबी समाज मंडळाने केल्याने ह्या मागणीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.  लॉकडाऊनच्या काळात मोल मजुरी करणारा मजूर, कामगार, लहान-मोठा दुकानदार, व्यापारी व नोकरदार आदींचा  रोजगार बुडाल्याने तर हाताला आजही काम नसल्याने हे सर्व आजच्या परिस्थितीत आर्थिक संकटांत आहेत. त्यातच महावितरणने एकदम वीज बिल आकारून ग्राहकांना  भरमसाट बिलाच्या माध्यमातून शॉक दिल्याची ओरड सुरू आहे. त्यातच आत्ता अश्या आर्थिक संकटात घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिल व गाळा किंवा घरभाडे कसे भरायचे हया विवंचनेत नागरिक व तालुक्यातील जनता आहे.  त्यामुळे  लॉकडाउनच्या काळातील  वीज, पाणी, घरपट्टी माफ व्हावी तसेच शासनाकडे यासाठी प्रयत्न व्हाव...

२५ ऑगस्ट रोजी पाच न्यायमूर्तींसमोर सुनावणी घेण्याबाबत निर्णय होणार..   

इमेज
   ठाणे : मराठा आरक्षण प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात समाधानकारक बाब झाली, आरक्षणावर कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Video Conferencing द्वारे सुनावणी होत आहे मात्र त्यात पुरावे सादर करण्यास अडचण येत आहे त्यामुळे तात्काळ सुनावणी घेण्याची घाई करू नये अशी मागणी आज आपल्या वतीने करण्यात आली. त्यावर मा.न्यायालयाने मराठा समाजाच्या बाजूने निकाल दिला. विरोधकांनी मागणी केली की, राज्य सरकारने त्वरित नौकरभरती घ्यावी व ज्यामध्ये मराठा आरक्षण नसावे. त्यावर राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, आज कोरोनाच्या महामारीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि ४ मे २०२०च्या शासन निर्णयानुसार नौकरभरती सध्या होऊ शकणार नाही. पाच न्यायमूर्तींसमोर सुनावणी घेण्यात यावी या आपल्या मागणीवर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येणार आणि ०१ सप्टेंबर पासून मुख्य सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने विविध विधिज्ञांमार्फत बाजू मांडल्या गेली तर माझ्यावतीने जेष्ठ विधीज्ञ पी.एस.नरसिंहा व अँड.संदीप देशमुख यांनी बाजू मांडली.आज आपल्या आरक्षणावर कुठलीही स्थगिती मिळाली ह...

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळी प्रमाणपत्रांसाठी सहा महिन्यांची मुदवाढ देण्याची निरंजन डावखरेंची मागणी

इमेज
ठाणे - अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळी प्रमाणपत्रांसाठी सहा महिन्यांची मुदवाढ द्यावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केली आहे. अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचा स्वत:चा जातीचा दाखला, विद्यार्थ्याचे महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र आणि उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य केले आहे.  सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित कागदपत्रे जमा करताना विद्यार्थी आणि पालकांची धावपळ उडणार आहे. कोरोनाच्या आपत्तीत महसूल विभागाचे बहूसंख्य कर्मचारी आपत्कालीन व्यवस्थेसाठी कार्यरत असून अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास मर्यादा येतील. त्याचबरोबर या प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयात गर्दी उसळण्याची भीती असून प्रमाणपत्राशिवाय नियमांच्या अधीन राहून अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची अट ठेवावी अशी मागणी आमदार डावखरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

ठाणे शहरात पुन्हा धूर फवारणी आणि निर्जंतुकीकरणाची मोहिम

इमेज
ठाणे - कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात निर्जंतुकीकरणासाठी व्यापक धूर फवारणी आणि स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोठया प्रमाणत मनुष्यबळ आणि मशीनरीच्या साहाय्याने संपूर्ण शहरात ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितले. आधुनिक यंत्राच्या साहाय्याने धुर फवारणी त्याचप्रमाणे सोडियम हायपोक्लोराईटच्या माध्यमातून संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने फवारणी करण्यात येणार आहे.  या मोहिमेंतर्गत कोपरी, गांधीनगर, परबवाडी, मनोरोग रुग्णालय, रघुनाथनगर, जय भवानीनगर, किसननगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर परिसरात सोडीयम हायपोक्लोराईट आणि धुर फवारणी करण्यात आली. शहरात निर्जंतुकीरणाची व्यापकता वाढविण्यासाठी अग्निशमन दलाचे ८ ट्रॅक्टर्स, ८ टँकर्स, ८ बोलेरो युटीलीटी जीप, ८ बॅटरीवर चालणारी रिक्षा आणि १० धुर फवारणी यंत्र तसेच १२५  हॅन्डपंपाव्दारे औषध फवारणी करण्यात आली.

वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठोकलं महावितरणच्या कार्यालयाला टाळं

इमेज
ठाणे - वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. कोरोनाच्या काळात एकीकडे हाताला काम नसताना वाढीव वीज बिल आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात लोकमान्य नगर येथील महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली. यावेळी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून गेट बाहेर महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता ४ महिन्यांपासून घराबाहेर पडू शकली नाही. तर बेरोजगारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या संकटकाळातच विज वितरण महामंडळाने सर्वसामान्य विज ग्राहकांचे विज मिटर रिडींग न घेता सरासरी विज देयक पाठवून दिली. वहन आकार आणि प्रत्येक युनिट मागे आकार वाढविण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असून हे आकार त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शहर मनसेचे प्रयत्न

इमेज
मुरबाड - कोरोना लॉकडाऊन काळात शाळा-कॉलेजेस पूर्णपणे बंद आहेत. मुरबाड तालुक्यातील इयत्ता १० वी व १२वीच्या बोर्डाच्या महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होऊ नये म्हणून खाजगी कोचिंग क्लासेसला मर्यादीत विद्यार्थ्यांना घेऊन सशर्त परवानगी दयावी या मागणी साठी मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश देसले व शहर सचिव तुषार म्हसे  यांनी पुढाकार घेतला असून नगर पंचायतीकडे लेखी निवेदन सादर करून लक्ष वेधले आहे. अन्यायग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांचे प्रश्न , कामगारवर्गाची पिळवणूक,शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्याच्या संदर्भात  मुरबाड शहर मनसेने सदैव पुढाकार घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा बंद असल्याने मुरबाड मधील १०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणीक नुकसान होत आहे.या बाबत मनसे कडे अनेक पालकांनी गाऱ्हानीं मांडल्या मुळे किमान काही खाजगी कोचिंग कलासेस कोरोनाच्या महत्वाच्या नियमावली निदेर्शीत करून सशर्त  सुरू करावेत.या आशयाचे लेखी पत्र  मुरबाड नगर पंचायतीचे मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांना मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश द...

वनविभाग   वाशाळा  यांच्या  कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा  धडक मोर्चा..

इमेज
 कसारा : दिनांक २७\०७\२०२०रोजी  शहापूर  तालुक्यातील  मौजे  वेळुक येथील  लक्ष्‍मण भावन्या वाघ   यांच्या पिढ्यानपिढ्या कब्जा वहिवाटीतील वन (व दंड भरलेल्या वनविभागाच्या दंडाच्या पावत्या असुन सुध्दा) जमीन प्लॉटमधील लागवड केलेल्या भात शेती ,नागली ,वरई या उभा   पिकावर वन परिक्षेत्र अधिकारी वाशाळा  यांनी दिनांक १६ /०७/२०२० रोजी आपल्या बळाचा वापर करून दमदाटी करून बेकायदेशीरपणे मशीनद्वारे लागवड केलेल्या  शेतीची   नुसकान  करून उभे पिक उद्धस्त केले आहेत .आदिवासी जमिनीतील लोक शेतीला आपली काळी आई मानुन शेतीतील पूजा करून त्याचे संवर्धन करण्यासाठी परंपरा आहे. निसर्गाने हिरवे झाडे या आपले दैवत म्हणून त्याची पूजा अर्चा करत असतात. शेतीला आदिवासी कुटुंब आपली खरी देवता मानत त्याचे लागवड केली जाते.   भात  पिकावर मशीन केलेल्या आपण  भावनांची  जाणून खेळ मांडला आहे .देशामध्ये व राज्यामध्ये  कोरोना  महामारी  विषाणू ने थैमान घातले असतांना पुर्ण देश व राज्य लाॅकडाऊन  झालेला आपन पाहतो आदिवासी गरीब कष्टकरी च्या ...

अघई परिसरात कोरोनाचा फैलाव,परीसरात कोरोनाचे रुग्ण वाढले.

इमेज
अघई: शहापूर तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना, तालुक्यातील खेडोपाडी कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची डोके दुःखी वाढत आहे. अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत अनेक गावपाडे येत आहेत,त्याच बरोबर परीसरातील गावामध्ये कोरोना रुग्ण सापडत असल्याने,आरोग्य यंत्रणेची ताराबंळ उडत आहे. शहापूर तालुका  विस्तृत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या आरोग्य केंद्रावर प्रचंड ताण येत आहे. रुग्ण कोविड सेंटर मधे दाखल करणे, नातेवाईकांना विलगिकरण  कक्षात ठेवणे अशी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. आरोग्य यत्रणेला ग्रामपंचायतीकडून मदत होत असून, रुग्ण सापडलेल्या ठिकाणी फवारणी त्याच बरोबर कोरोना बाधित क्षेत्रात नागरिकांना प्रतिबंध इत्यादी कामात ग्रामपंचायतीकडून आरोग्य यंत्रणेला  मदत होत आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संस्थाकडुन मुख्यमंत्री निधीत ५१००० रूपयांची मदत    

इमेज
पडघा : सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संस्था भिवंडी अध्यक्ष शरदचंद्र कुंवर आणि कार्याध्यक्ष बी.बी.जाधव यांच्या हस्ते ५१००० रुपयांचा चेक  कल्याणचे तहसीलदार आकडे आणि नायब तहसीलदार बांगर यांना सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या या सामाजिक बांधीलकीच्या भावनाचां तहसीलदाराची आदर व्यक्त करून कौतुक केले. सर्व  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ऊत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. सस्थेच्या अध्यक्ष शरदचंद कुंवर यांनी संस्थेतील सर्व सभासदांनी  मदतीच्या हाकेला जी साद दिली त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.      

कोरोना संकटातही शिक्षक -विद्यार्थी संवाद ठेवणारे शिक्षक-भालचंद्र गोडांबे    

इमेज
मुरबाड -  गेले चार महिने संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगच ठप्प झालेले पाहायला मिळाले . उद्योग ,व्यवसाय ,व्यापार ,शिक्षण ,सर्वच बंद . महाराष्ट्र शासनाने दहावी -बारावीच्या परिक्षा घेऊन बारावीचा निकाल घोषित केला . दहावीचा निकाल आज लागणार आहे  परंतु नविन शाळा प्रवेश व प्रत्यक्ष अध्यापन कधी सूरु करायचे याबाबत शासन ठाम भूमिका  घेताना दिसत  नाही. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या १५ जून पासून सूरु होतात परंतु कोरोना संकटात ते शक्य नसल्याने आॕनलाईन अध्यापनात  अनेक अडचणींना सामोरे जावे  लागत आहे कारण ग्रामिण भागात तर अनेक  पालकांकडे मोबाईल फोनच उपलब्ध नाही तर काही ठिकाणी नेटवर्क नसतो. आदिवासी दुर्गम डोंगराळ  भागात   एका घरात दोन ते तीन मुले असतिल तर वडिलांच्या एका फोन वर कसा  अभ्यास करायचा  अशा एक ना  अनेक तांत्रिक अडचणी  या आॕनलाईन शिक्षणात येत आहेत. शिवाय अनेक दिवस विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी संपर्कच तुटलेला आहे.    ना वह्या ना दप्तर ना पाटी ना पेन्सिल अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत  शिकणाऱ्या...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे 'प्लाझ्मा दान संकल्प' अभियान

इमेज
पिंपरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे २७ जुलै ते ३ ऑगस्ट २०२० दरम्यान ‘चला कोरोनाला हरवूया,  चला प्लाझ्मा दान करुया’ या मोहिमेअंतर्गत ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी  शिवसेनेकडून कोरोनामुक्त झालेल्यांशी संपर्क साधला जात आहे. प्लाझ्मा दान करु इच्छिणा-याला वायसीएममध्ये नेण्याची आणि घरी सोडण्याची सोय केली जाणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळत आहेत. त्यांचे संपूर्ण राज्यावर बारीक लक्ष असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियान राबविण्यात येणार आहे. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, एकीकडे शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. पण, दुसरीकडे बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. आजपर्यंत सुमारे साडेनऊ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे रुग्ण आपला प्लाझ्मा दान करु शकतात.प्लाझ्मा थेरपी यशस्वी होत आहे. थेरपी केल्याने २० हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.प्लाझ्मा हा अँटीबॉडी व विषाणू बरोबर लढा देणाऱ्या पेशींचा समूह आहे.क...

कल्याणमध्ये अंध श्रद्धेतून माय लेकाची हत्या.

इमेज
कल्याण : अंगात भूत असल्याच्या कारणावरुन झालेल्या बेदम मारहाणीत आई आणि मुलाचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . एकिकडे कोरोनामुळे सर्वजण हवालदिल झाले असताना कल्याण जवळील अटाळी गावात घडलेल्या या प्रकाराने खलबळ उडवून दिली आहे .याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मांत्रिकासह ३ जणांना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे .  चंदूबाई शिवराम तरे ( ७६) आणि पंढरीनाथ शिवराम तरे ( ५० )अशी या प्रकरणात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत . अटाळी गावातील तथाकथित मांत्रिक सुरेंद्र पाटील याने चंदूबाई आणि पंढरीनाथ यांच्या अंगात भूत असल्याचे पंढरीनाथ तरे यांच्या पत्नी आणि पुतणीला सांगितले अंगातील हे भूत बाहेर काढण्यासाठी २५ जुलै रोजी राहत्या घरात दोघींच्याही ( चंदूबाई व पंढरीनाथ ) अंगावर हलद टाकुन नातेवाईकांनी लाकडी दांडक्याने दुपारी साडेचार ते रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत मारहाण केल्याचे दाखल तक्रारीत नमुद करण्यात आले आहे .तर तब्बल ४ तासाहुन अधिक काल हा सर्व प्रकार सुरु होता .ज्यामध्ये इंदूबाई आणि पंढरीनाथ या दोघांनाही आपला जीव गमवावा लागल्याचेही यामध्ये नमुद करण्यात...

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पोलिसांना मिळणार साडेचार हजार घरे

इमेज
ठाणे - सिडकोच्या माध्यमातून पोलीसांना साडेचार हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परवडणा-या घरांच्या योजनेत पोलीसांसाठी राखीव घरं ठेवण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे सिडकोच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीसांसाठी विशेष बाब म्हणून घरं राखीव ठेवण्यात आली आहेत. मुंबई महानगर परिसरात पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट असून गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे उपलब्ध होताना अडथळे येत आहेत. आता शिंदे यांच्या या निर्णयामुळे घरांच्या ऑनलाइन नोंदणीला उद्यापासून सुरुवात होत आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका विशेष ऑनलाइन सोहळ्यात या नोंदणीला सुरुवात होणार आहे. नवी मुंबईत सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये एकूण ४ हजार ४६६ सदनिका पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी या सदनिका उपलब्ध असून केवळ मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी त्या राखीव आहेत. मासिक उत्पन्न २५ हजार रुपयांपर्यंत आणि...

मुरबाड मधील कुडवली एम.आय. डीसीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू ! पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह !             

इमेज
 मुरबाड : सुमारे चार तासांपासून गायब असलेल्या सिक्युरिटी गार्डचा मृत अवस्थेत देह सापडल्याची घटना आज सकाळी मुरबाड एम. आय. डी. मध्ये घडली आहे.   किसन काशिनाथ भावार्थे ( २५ ) असे मृताचे नाव असून तो मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानिवली (खुर्द) येथील राहणारा आहे. मुरबाडच्या कुडवली ऍडीशनल एम. आय. डी. मधील सुपर गॅस कंपनीमध्ये तो सुमारे अडीच वर्षांपासून BIS या कंपनी अंतर्गत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. काल सायंकाळी रात्रपाळीला हजर झालेला किसन आज सकाळी साडेसहा वाजेपासून कंपनीमध्ये दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली होती.  प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास किसनचा मोठा भाऊ त्याला जेवणाचा डबा घेऊन कंपनीत आला असता किसन लाईट बंद करण्यासाठी गेल्याचे त्याच्या सहकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सदर जेवणाचा डबा किसनला देण्याचे सांगून तो आपल्या कामाला निघून गेला. मात्र तासाभराने त्याने पुन्हा किसनला दोन वेळा कॉल केल्यावर तो अद्याप आला नसल्याचे सिक्युरिटी केबिनमधून त्याला सांगण्यात आल्याने तो कंपनीकडे आला व किसनची शोधाशोध सुरू झाली. त्याचे बूट कंपनीमधील एका पाण्याच्या टाक...

पोलिसांच्या विनंती नंतर नारळी पौर्णिमा उत्सव रद्द करण्याचा पालिकेचा निर्णय

इमेज
  ठाणे - यावर्षीचा नारळी पौर्णिमा उत्सव रद्द करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने कोळी बांधवांसाठी दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन मोठ्या स्वरुपात करण्यात येते. या निमित्ताने कळवा सर्कल, क्रिक नाका ते ठाणे पोलिस मुख्यालया समोरील रोड, क्रिक नाका ते सिडको रोड येथे भव्य यात्रा भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करणे योग्य होणार नसल्याने महापालिका प्रशासनाने नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करु नये तसेच त्याअनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती ठाणे नगर पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने यंदा हा उत्सव रद्द केला आहे. कळवा ब्रीज येथे खाडीत दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी ठाणे शहर आणि परिसरातील बहुसंख्य कोळी, आगरी बांधव इतर समाजाचे लोक एकत्र येतात. खाडीची पूजा करण्यासाठी तसेच नारळ अर्पण करण्यासाठी या परिसरात ७० ते ८० हजार नागरिक येतात आणि पालखी मिरवणुकीत ४०० ते ५०० नागरिक सहभागी होतात. यावर्षी ३ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करणे योग्य होणार नाही. तरी नारळी पौर्णिमेनिमित्त...

खासगी रूग्णालयामधून शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती लेखी स्वरुपात देण्याची मागणी

इमेज
  ठाणे - महापालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयाधून शासकीय आरोग्य योजनांच्या झालेल्या अंमलबजावणीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. येत्या ३ ऑगस्ट पासून विधिमंडळ अधिवेशन सुरु होत असून महत्वाच्या अशा कोरोनाच्या मुद्यावरही चर्चा होणार आहे.  कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या, कशी अंमलबजावणी केली याचाही आढावा घेतला जाणार असून महापालिका हद्दीत एकूण किती खासगी हॉस्पिटल आहेत ? किती रूग्णालयं कोविड रूग्णालयं म्हणून घोषित केली आहेत, आजवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य उपचार किती रूग्णांवर झाले याची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी तसंच खाजगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णांची लूट केल्याच्या अनेक तक्रारी असून पालिकेनं अशा किती रूग्णालयांना आजपर्यंत नोटिसा दिल्या आहे आणि बिलांबाबत ऑडीटरने केलेल्या चौकशीविषयी सविस्तर खुलासा द्यावा, बेड उपलब्ध असूनही गरीब रूग्णांना दाखल करून घेतलं नाही अशाही तक्रारी असून त्याबाबत महापालिकेनं काय कारवाई केली.  कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करी...

आमदार प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने विनामूल्य पोर्टेबल ऑक्सीन मशीन सेवेचा शुभारंभ

इमेज
ठाणे -   शाखा तिथे दवाखाना या आमदार प्रताप सरनाईकांच्या उपक्रमांतर्गत विनामूल्य पोर्टेबल ऑक्सीजन मशीन सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच सरनाईक यांनी शाखा तिथे दवाखाना उपक्रम लोकांसाठी सुरू केला आहे. आता त्याअंतर्गत ही ऑक्सीजन मशीन सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन ही पोर्टेबल ऑक्सिजन मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना २४ तास ऑक्सिजनची गरज असून ज्या रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही त्यांना घरीच पोर्टेबल ऑक्सिजन मशीन उपलब्ध करुन दिल्यास रुग्णाचा प्राण वाचू शकतो. तसंच शाखा तिथे दवाखाना या अंतर्गत औषधंही नागरिकांना विनामूल्य दिली जात आहेत. सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत तपासणी करणाऱ्या मेडिकल अधिकाऱ्याला संपूर्ण पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत.  कोरोनाबाधित रुग्णांना विनामूल्य पोर्टेबल ऑक्सिजन मशीनची आवश्यकता असल्यास लोकमान्य नगर प्रदीप खाडे यांच्याशी  ९८२०३९१११२ , रामचंद्र गुरव, ९८९२१७९८७५ , वर्तकनगर-समता नगर अनिल भोईर यांच्याशी ९९८७८६८६८६ , शिव...

बिबट्या आढळलेल्या परिसरात डोळखांब वनविभागाकडून लाऊड स्पीकरद्वारे सूचना दिल्या..

इमेज
डोळखांब :  तालुक्यातील मौजे चोंढे.बु गावाच्या हद्दीत मागील आठवड्यात रात्री व दिवसाही बिबट्याचे दर्शन झाले होते.बिबट्याच्या या मुक्त संचाराने स्थानिक नागरिक व पाळीव प्राण्यांना विशेष धोका निर्माण झाला होता.याधीही या बिबट्याने स्थानिक आदिवासी वाड्यापाड्यांतील गरीब शेतकऱ्यांच्या गाई,शेळ्या फस्त केल्याच्या घटना घडून आल्या होत्या.बिबट्या आढळून आल्या संदर्भात वृत्तप्रसिद्धी केल्यानंतर डोळखांब वनविभागाने प्रसंगावधान राखत नागरिकांनी खबरदारी बाळगण्यासाठी लाऊड स्पीकरद्वारे सूचना दिल्या आहेत. बिबट्याचा हा मुक्त वावर येथील नागरीकांसाठी नवा नसला तरी साकुर्ली वनक्षेत्राचे वनपाल जयवंत फर्डे यांनी तत्परता दाखवत चोंढे बु.परिसरात आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सूचना देणारे बॅनर लावले आहेत.बिबट्या हा प्राणी शक्यतो माणसांना इजा करत नसून कुत्रे व इतर पाळीव प्राण्यांची शिकार करण्यासाठी गावाकडे आल्यास ढोल किंवा थाळीनाद करून पळवून लावावे अशा प्रकारच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या.वन्यजीव प्राण्यांना इजा करणे हा कायद्याने गुन्हा आहे हे पटवून देऊन नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यासाठी आवाहन केले आहे. ...

कल्याण - डोंबिवलीतील कोविड सेंटर ,कोविड प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन 

इमेज
कल्याण : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळेसह आणि कल्याण- डोंबिवलीतील कोविड सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री  मा, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन  पद्धतीने करण्यात आले . मुंबई महानगर क्षेत्र परीसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृ्ष्टीने आवश्यक  त्या उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी  त्यांनी दिले.   कोरोना संकटकालात महाराष्ट्र शासन खंबीर आहे . वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्याप्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्याच्या सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.