कोरोना संकटातही शिक्षक -विद्यार्थी संवाद ठेवणारे शिक्षक-भालचंद्र गोडांबे
मुरबाड - गेले चार महिने संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगच ठप्प झालेले पाहायला मिळाले . उद्योग ,व्यवसाय ,व्यापार ,शिक्षण ,सर्वच बंद . महाराष्ट्र शासनाने दहावी -बारावीच्या परिक्षा घेऊन बारावीचा निकाल घोषित केला . दहावीचा निकाल आज लागणार आहे परंतु नविन शाळा प्रवेश व प्रत्यक्ष अध्यापन कधी सूरु करायचे याबाबत शासन ठाम भूमिका घेताना दिसत नाही. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या १५ जून पासून सूरु होतात परंतु कोरोना संकटात ते शक्य नसल्याने आॕनलाईन अध्यापनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे कारण ग्रामिण भागात तर अनेक पालकांकडे मोबाईल फोनच उपलब्ध नाही तर काही ठिकाणी नेटवर्क नसतो. आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात एका घरात दोन ते तीन मुले असतिल तर वडिलांच्या एका फोन वर कसा अभ्यास करायचा अशा एक ना अनेक तांत्रिक अडचणी या आॕनलाईन शिक्षणात येत आहेत. शिवाय अनेक दिवस विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी संपर्कच तुटलेला आहे.
ना वह्या ना दप्तर ना पाटी ना पेन्सिल अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्यात शाळेबद्दल ,शिक्षणाबद्दल ओढ निर्माण व्हावी . विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत म्हणुन मुरबाड शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नं.२ येथिल प्राथमिक शिक्षक भालचंद्र गोडांबे यांनी घरी न बसता गेली पंधरा दिवस इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शासनाचे नियम पाळत सामाजिक अंतर राखून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून अभ्यासाबाबत चौकशी व मार्गदर्शन करत आहे. लाॕकडाऊन मधे त्यांनी सूरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. तालुक्यातील इतर शिक्षकांनीही त्यांचे अवलोकन केले तर शिक्षणाचा गुंता सुटण्यास निश्चित मदत होईल व शिक्षणाची प्रक्रीया निरंतर सूरू राहिल .विद्यार्थी व शिक्षक यांच्या मधे संवाद वाढुन निश्चितच त्याचा फायदा होईल असे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले .