वनविभाग   वाशाळा  यांच्या  कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा  धडक मोर्चा..

 कसारा : दिनांक २७\०७\२०२०रोजी  शहापूर  तालुक्यातील  मौजे  वेळुक येथील  लक्ष्‍मण भावन्या वाघ   यांच्या पिढ्यानपिढ्या कब्जा वहिवाटीतील वन (व दंड भरलेल्या वनविभागाच्या दंडाच्या पावत्या असुन सुध्दा) जमीन प्लॉटमधील लागवड केलेल्या भात शेती ,नागली ,वरई या उभा   पिकावर वन परिक्षेत्र अधिकारी वाशाळा  यांनी दिनांक १६ /०७/२०२० रोजी आपल्या बळाचा वापर करून दमदाटी करून बेकायदेशीरपणे मशीनद्वारे लागवड केलेल्या  शेतीची   नुसकान  करून उभे पिक उद्धस्त केले आहेत .आदिवासी जमिनीतील लोक शेतीला आपली काळी आई मानुन शेतीतील पूजा करून त्याचे संवर्धन करण्यासाठी परंपरा आहे. निसर्गाने हिरवे झाडे या आपले दैवत म्हणून त्याची पूजा अर्चा करत असतात. शेतीला आदिवासी कुटुंब आपली खरी देवता मानत त्याचे लागवड केली जाते.


  भात  पिकावर मशीन केलेल्या आपण  भावनांची  जाणून खेळ मांडला आहे .देशामध्ये व राज्यामध्ये  कोरोना  महामारी  विषाणू ने थैमान घातले असतांना पुर्ण देश व राज्य लाॅकडाऊन  झालेला आपन पाहतो आदिवासी गरीब कष्टकरी च्या  हाताला काम  नसल्याने अनेक कुटुंबांना त्यांना त्यांचे जीवन कसे जगावे यांची भ्रांती पडलेली आहे. म्हणुन श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्रमजीवी संघटना चे सरचिटनीस बाळाराम भाऊ भोईर. जिल्हा सरचिटनीस दशरथ  भालके व जिल्हाचे तालुक्याचे अनेक पदाधिकारी व संघटना चे हजारों कार्यकर्ते उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...