सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट यांची तब्बल अडीच तास चौकशी 


मुंबई : सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ४०  हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले आहेत. अगदी त्याच्या स्वयंपाकी कुक पासून ते बॉलीवूड मधल्या अनेक नामवंत कलाकारणचेही जबाब घेण्यात आले .. त्यात काही दिग्दर्शकांनाही चौकशी साठी सामोरे जावे लागले. मात्र बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आली. अभिनेत्री कंगना राणावत हिच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी भट्ट यांची चौकशी केली.महेश भट्ट तसेच करण जोहरच्या मॅनेजरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स वांद्रे पोलिसांकडून बजाविण्यात आले होते. आवश्‍यकता भासल्यास करण जोहर याचीही पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


सिनेअभिनेत्री कंगणा राणावत हिच्या आरोपानंतर वांद्रे पोलिसांनी ही चौकशी सुरू केली आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात महेश भट्ट यांना बोलवल्यास या ठिकाणी प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची गर्दी होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे भट्ट यांना सांताक्रूझ पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यानुसार त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली. सुशांतच्या आत्महत्येदरम्यान महेश भट्ट हे त्याच्या अधिक जवळ असल्याने, त्यांची ही चौकशी करण्यात आली. १४ जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास सध्या वांद्रे पोलिस करत आहे.


संजय लीला भन्साली, रुमी जाफरी, आदित्य चोप्रा यांच्यानंतर पोलिसांनी कंगणा राणवत हिलादेखील चौकशीसाठी समन्स पाठविले आहे; मात्र ती सध्या मनाली येथे वास्तव्यास आहे, तिला मुंबईत येणे शक्‍य नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने काही चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करताना महेश भट्ट, करण जोहरसह इतर काही निर्माता-दिग्दर्शक, कलाकारांवर गंभीर आरोप केले होते. तिने केलेल्या गटबाजीसह घराणेशाहीच्या आरोपाने एकच खळबळ उडाली होती. त्याचाच एक भाग म्हणून वांद्रे पोलिसांनी महेश भट्ट यांच्यासह करण जोहरच्या मॅनेजरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले. मात्र यातही कंगणाने करण जौहरला चौकशीसाठी का बोलविले नाही, याबाबत ट्‌विट केले आहे.दरम्यान, गरज पडल्यास करण जौहर यांचीही पोलिसांकडून चौकशी होऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.


आतापर्यंतच्या चौकशीत सुशांतने नैराश्‍यातून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे; मात्र या नैराश्‍येचे कारण काय होते? त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटत होती? आपले करिअर संपणार, आपणास कोणीतरी मारणार आहे? याबाबत त्याला नेहमीच भीती वाटत होती. त्याला नक्की कोणाची भीती वाटत होती, करिअरच्या सुरुवातीला चांगले चित्रपट मिळत असतानाही तो अचानक नैराश्‍यात का गेला? त्याच्या आत्महत्येमागे बॉलीवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे का? याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार बॉलीवूडशी संबंधित प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.त्यात सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंग, घरगडी केशव बच्चानार, मॅनेजर दीपेश सावंत, क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ राममूर्ती पिठानी, बहीण नितू सिंग, मितू सिंग, वडील के. के सिंग, अभिनेता महेश शेट्टी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, व्यावसायिक मॅनेजर श्रुती मोदी, पीआर मॅनेजर अंकिता तेहलानी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी, लेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी, यशराज फिल्मचे अध्यक्ष आणि निर्माता आदित्य चोपडा, तीन पत्रकार, तीन मनोचिकित्सकासह एका मानसशास्त्रज्ञाचा समावेश आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...