अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळी प्रमाणपत्रांसाठी सहा महिन्यांची मुदवाढ देण्याची निरंजन डावखरेंची मागणी


ठाणे - अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या वेळी प्रमाणपत्रांसाठी सहा महिन्यांची मुदवाढ द्यावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ही मागणी केली आहे. अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचा स्वत:चा जातीचा दाखला, विद्यार्थ्याचे महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र आणि उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य केले आहे. 


सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता संबंधित कागदपत्रे जमा करताना विद्यार्थी आणि पालकांची धावपळ उडणार आहे. कोरोनाच्या आपत्तीत महसूल विभागाचे बहूसंख्य कर्मचारी आपत्कालीन व्यवस्थेसाठी कार्यरत असून अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास मर्यादा येतील. त्याचबरोबर या प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयात गर्दी उसळण्याची भीती असून प्रमाणपत्राशिवाय नियमांच्या अधीन राहून अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. तसेच संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची अट ठेवावी अशी मागणी आमदार डावखरे यांनी पत्राद्वारे केली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...