कळंभे हद्दीत ठक्कर कंपाऊंड शेजारी कचऱ्याचे ढीग ; रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात 


आसनगाव : शहापुर तालुक्यातुन  जाणाऱ्या  मुबंई-नासिक महामार्गालगत अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याची ओरड कित्येक  वर्षा पासून आहे. त्यातच महामार्गालगत कळंभे  गावाच्या हद्दीत ठक्कर कंपाऊंड शेजारी  कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवून कचरा हटविण्यासाठी लेखी मागणी ठक्कर कपाऊंड  व विकास मंडळ गुजराथी बाग रहिवासी संघाने ग्रामविकास अधिकारी  ग्रुप ग्रामपंचायत बोरशेती-कळभे यांच्याकडे केली आहे.


 मुबंई-नासिक महामार्गालगत शहापुर तालुक्यातील अनेक हद्दीत ओला व सुका कचरा टाकला जात असल्याची समस्या कित्येक वर्षांपासून आहे.  मात्र याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने  परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची ओरड नेहमीच होते. त्यातच सध्या कोरोनाचे थैमान सुरू असतांनाच   महामार्गालगत कळंभे हद्दीतील ठक्कर कंपाउंड शेजारी  कचऱ्याचे ढीग साचल्याने ह्या भागात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा आरोप वजा तक्रार रहिवाशी संघाने ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातुन केली आहे.  


१५ दिवसांपूर्वी सदरचा  कचरा हटवला जाईल असे कळंभे ग्रामपंचायतीने सांगितले होते.  मात्र अद्याप कचरा न हटवता आणखी कचरा मोठया प्रमाणात साचत असल्याचा आरोप निवेदनातुन केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सदरचा कचरा उचलून जागा साफ करावी तसेच सदरच्या जागेत कचरा न टाकण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी  कळंभे ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी,  व शहापुर नगरपंचायतीकडे रहिवासी संघाने  केली आहे.


 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...