"मी महाराष्ट्राचा .... महाराष्ट्र माझा.... "

 


तसं ‘ठाकरे’ या आडनावातच जादूआहेम्हणा! या कु टुंबात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती हा जहाल मतवादी प्रकारातला स्पष्टवक्ता राहहलाय. मग तेप्रबोधन ठाकरे असो, बाळासाहेब ठाकरेवा आजचेराज ठाकरे, पण या सवाांपुढेउद्धवसाहेब अहतशय हमतभाषीच वाटतात. तरीही स्पष्टमतवादीपणा हा रक्ताचाच गुणधर्म आहे म्हणा. 


लीडर कुणाला म्हणावं? तर “जेंव्हा तुम्ही जबाबदारी घेण्यास पात्र ठरता, त्यावेळी तुमच्यात समजूतदारपणा आहण कल्पक नेतृत्व हेगुण असायलाच हवेत! नाहीतर शासन आलं म्हणून जर शासक झालात, तर जनतेचं प्रेम तुम्हांला कधीही हमळूशकणार नाही. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा, गरजा यांचा कधीही थांगपत्ता लागणार नाही”. हे शब्द आहेत एका महान लीडरचे.कुणी कुणाला समजून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी, मी माझ्या लोकांना समजून घेतलंच पाहिजे ज्यांच्या आर्शिवादाने आज मी या महाराष्ट्राच्या ‘कुटुंबप्रमुख’ या गादीवर बसलो आहे. तेही ना शाखाप्रमुख, ना नगरसेवक, ना आमदार, तर थेट मुख्यमंत्री. का? तर सहकारी म्हणवणारांच्या आडमुठी धोरणामुळे. कदाचित त्याचमुळे आजच्या महाराष्ट्राच्या
आडमुठे राजकारणात महाभारतचं कलुषित राजकारणच प्रतिबिंबित होतंय असंच वाटतं.



काय हवं होतं युधिष्ठिराला ? आपला अधिकारच ना! आजपर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत जगत आलो, त्यामुळे लहानाचे
सगळेच हट्ट पुरवले. आज थोडंसं बळ, काय कमी पडलं तर तुम्ही “सुईच्या अग्रावर मावेल एव्हढीही भूमी देणार नाही” याच हेकडीपणात राहिलात. पण शेवटी काय झालं, ‘जे सुईचं अग्र तुम्ही मला नाकारलंत, तेच अग्र आज तुम्हांला पारखं झालंय’.
आज महाराष्ट्रात ठाकरे सरकार येऊन काहीच महिने झालेत, तर या काही महिन्यात कधी विरोधकांनी, कधी मिडीयाने तर कधी स्वत:ला समाज हितचिंतक संबोधून घेणा-यांनी उद्धवसाहेबांना अनेक अर्थाचे कडूबोल लावले. “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून तर सोडा पण नुसतं नेता म्हणूनही जन्माला आलेले नाहीत. ते फक्त वारसा चालवत आहेत आपल्या वडिलांचा. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे“अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री” आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आहण मातोश्रीवरून आपल्या अनुयायांवर आदेश सोडवा.. बस्स..!” असे उद्गार आहेत, मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या असलेल्या एका विरोधी पक्षातील आमदाराचे. त्यांचचं अनुकरण करत काही ‘बोलक्या साळुंख्या’ आणि ‘कावळे’ यांनी तर आपल्या अकलेचे तारे पाजळले, कुणी साहेबांना अकार्यक्षम म्हंटलं, कुणी दुसऱ्यांच्या उपकराखाली दबलेलं नेतृत्व, तर कुणी कणा नसलेला नेता. एव्हढ्या विषारी टिका
होऊनही तुम्ही शांतच राहिला!


 



का? काय कारण असेल? आजपर्यंत पक्षप्रमुख म्हणून तुम्ही फक्त आपले कार्यकर्ते, पक्षातील नेते आणि पारंपारिक मतदार यांचाच विचार केला होता. शिवाय यापूर्वी सत्तेत सहभागी होऊनही केवळ दुस-यांना ‘आदेश’च दिलात. त्यामुळे प्रशासनात काम कसं करायचं,कदाचित हेच माहित नसावं? तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपली निवड निश्चित होताच, तुम्ही पहिला महाराष्ट्र समजून घ्यायला सुरवात केली. “जर महाराष्ट्राच्या जनतेनेच त्यांचं पालकत्व मला दिलं असेल तर मलाही महाराष्ट्राचा पालक म्हणून स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागेल. नाहीतर तो माझ्यावर विश्वास ठेवणा-या लोकांचा विश्वासघात ठरेल..!” या आपल्या बोलाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हेलावून सोडलंत. कर्तुत्ववान  माणसाचा खरा कस लागतो तो समोर आलेल्या कठीण परिस्थिती मध्ये. त्यावेळी तो काय आणि कसे निर्णय घेतो यावरच त्याच्या सा-या यश-अपयशाची मदार असते.
“विजयाचा उन्माद कु णीही करतं, पण पराभवातही आपल्यांच्या मोडलेल्या मनांना उभारी देणा-यालाच हे जग “ग्रेट लीडर” मानतं.” मुख्यमंत्री म्हणून आपल्या एक गोष्ट लक्षात आली की, महाराष्ट्राला समजून घेण्यासाठी, पहिलं त्यातील माणसं, त्यांच्या गरजा, त्यांची दु:ख समजून घ्यायला हवीत. त्यावेळी तुम्ही आपल्यावरती भुंकणा-या श्वापदांपेक्षा कष्टक-यांच्या मुलभूत प्रश्नांना प्राधान्य दिलं आणि समोर पाहिलं ते भयाण वास्तव. जनता पिचलेली आहे, घाबरलेली आहे पण मनाने मोडलेली नक्कीच नाही. त्यांच्यात कष्ट करण्याची जिद्द अजूनही शिल्लक  आहे. त्यांना हवाय फक्त मदतीचा एक हात. अर्थात तुम्हांला जाणवलं ते आमच्यासाठी नक्कीच सुखकारक होतं. तुम्ही आमच्या मनांना उभारी देण्याचं काम हाती घेतलंत, कारण शेवटी हीच कष्टकरी
जनता पुन्हा एकदा महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देतील, हाच तुमचा आमच्यावरील विश्वास. “म्हणूनच तुम्ही आपल्या कामाच्या शुभारंभाचा पहिला टिळा शेतक-यांच्या भाळी फासलात”. दोन लाखांपर्यंतच थकीत कर्ज माफ तर नियमित कर्ज भरणा-यांना पन्नास हजार रुपयांची ठसठसीत शाबासकी देऊन! अजून काय हवं असतं एका कष्टक-याला उभं रहायला,
आम्ही तर फक्त मदतीच्या एका बोटाची अपेक्षा ठेवली होती, तुम्ही तर आख्ख्या हात हातात दिलाय. आता बघा महाराष्ट्राच्या मातीचा कायापालट होतोय का नाय ते..!



आपल्या या निर्णयाने आमची पिचलेली मनं सावरायला लागलीच होती की, कोरोनाच्या महामारीने उपट खाल्ली. कोरोनाच्या या जैविक युद्धात ज्यावेळी भल्याभल्या देशांनी गुडघे टेकले, तिथे तुम्हांला उपाय सापडल्यागत “सोशल डिस्टन्स”च्या नियमाखाली तुम्ही सरळ आम्हांलाच घरातून बाहेर पडण्याचे निर्बंध लावलेत. तुमच्या या निर्णयाला विरोधकांना चूक ठरवायचंच होतं की, आपल्याच निर्णयाचं अनुकरण केंद्र सरकारने देखील केलं, त्यामुळे म्यानातून बाहेर येऊ पाहणा-या विषारी जिव्हा पुन्हा म्यान झाल्या. आता करायचं काय? प्रश्न गंभीरये… कच घावून चालायचं नाही हा विचार करून तुम्ही निर्णय घ्यायला सुरवात केली. “नको अभ्यास समिती की, नको गृहपाठ, फक्त निर्णय फटाफट..!” सुरवात लहान लेकरांपासून केली, त्यांची शाळा बंद करून. मग रस्त्यावरचे ठेले, त्यानंतर प्रायव्हेट ऑफिसेस, सरकारी कार्यालयं आणि शेवटी दळणवळणाची साधने म्हणजे रेल्वे, मेट्रो, बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सर्वकाही बंद. पहिला २२ मार्चला ‘जनता कर्फ्यू’ आणि लगेच २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यातून कोणतीही अफरातफरी माजू नये, लोकांचा गोंधळ उडू नये म्हणून तुम्हीच आम्हांला
आमच्या गरजेच्या सर्व सुविधा २४ तास मिळतील याचं आश्वासन दिलंत. तसा आपल्या यंत्रणेला आदेशही दिलात, “जनतेच्या प्रार्थमिक  गरजांची तीन महिन्यांसाठींची तरदूत चालू करा..!” सध्याचा काळ हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने अतिशय जिवघेणा आहे. या वेळेस हवाय फक्त संयम आणि सकारात्मक दृष्टीकोन. अशा कठीण परिस्थतीमध्येही तुम्ही कायम आमच्या समोर येऊन, आमचं मनोधैर्य वाढवत राहिलात आणि आमच्या जगण्यासाठी आमच्याच समोर नतमस्तक झालात, शिवाय यामागचं कारणही सांगितलंत, “तुम्ही जगलात तर महाराष्ट्र जगेल आणि महाराष्ट्र जगला तरच माझ्या असण्याला अर्थ उरेल…!” तुमच्या या आपुलकीने आम्हांला जगण्याचं नवं बळ मिळालं. आम्हांला माहितीये, शिवसेना हा नुसता एक राजकीय पक्ष नसून एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेची सुरवातच ‘बाळासाहेब ठाकरे यांनी, ८०%समाजकारण आहण २०%
राजकारण‘ या तत्वावर केली असली तरी, तुम्ही त्याला फक्त १००% समाजकारणचं हे रूप दिलंय.” आज महाराष्ट्राची जनता म्हणून आम्ही शाश्वत आहोत की, आता आम्हांला काहीही कमी पडणार नाही कारण आपल्यासारखा आम्हांला समजून घेणारा मुख्यमंत्री, या वैभव संपन्न महाराष्ट्राला कुटुंबप्रमुख म्हणून लाभलाय…! म्हणूनच तुमच्याच घोषणेला पुन्हा म्हणावंसं
वाटतं, ‘मी महाराष्ट्राचा… महाराष्ट्र माझा…’ विषय खल्लास…!” आज तुमच्या जन्मदिनी आम्हां जनतेकडून आपणांस प्रेमपूर्वक शुभेच्छा आणि तुम्हांला निरोगी व दीघामयुषी शरीरसंपदा लाभो ही “विधात्या” चरणी प्रार्थना....!
जय हिंद.... जय महाराष्ट्र...!!


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...