जीवरक्षक इंजेक्शनचा काळा  बाजार ..... 


कल्याण : एकीकडे काही डॉक्टर कोरोना पासून वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाज़ी लावत असताना काही डॉक्टर मात्र लोकांना लूटायची सुवर्णसंधी म्हणुन या आजाराकडे पाहत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे . संशयीत कोविड रुग्णाच्या मृत्युप्रकरणी डॉक्टर आणि रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मुख्यमंत्री। उध्दव ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी दाद मागीतली आहे .तसेच संबंधित डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे .  


 कल्याण ( प )येथील काळा तलाव परीसरात राहणा-या जेष्ठ नागरीकाला २१ जुलै ला कल्याण ( प ) मधिल शिवम् हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते त्यांची कोविड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी सिटी स्कँनमध्ये त्यांना संसर्ग झाल्याचे शिवम् हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रूग्णाच्या नातेवाईकांना सांगितले .तसेच दुसर-या दिवशी सकाळी  रूग्णाची अॉक्सीजन लेव्हल कमी झाल्याचे सांगून २ इंजेक्शन आणण्यास सांगीतले . शिवम् हॉस्पिटलच्या ख़ाली असलेल्या मेडिकलमधून ही २ इंजेक्शन दुप्पट किंमतीत म्हणजेच  १ लाख २० हज़ार रूपयांना खरेदी  केल्याची माहीती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली.प्रत्यक्षात या एका इंजेक्शनची किंमत ३१ हज़ार ५०० रुपये इतकी किंमत आहे . त्यानंतर आणखी २ इंजेक्शनही आम्हाला आणायला  सांगितली . मात्र ही इंजेक्शन रुग्णाला दिली किंवा नाहीं याबाबतही नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे .तर २२ जुलैला रुग्णाचे आणि आमचे फोनवर बोलणे झाले. मात्र अचानक रात्री  ११.३० वाजता रुग्णाची तब्बेत बिघडली असुन त्याला व्हेंन्टीलेटरवर ठेवावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहीती नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रारीत नमुद केली आहे .



 २६ जुलै रोज़ी सीसीटीव्ही फ़ुटेज घेण्यासाठी संबंधित रूग्णाचे नातेवाईक तिकडे गेले असता त्यांना धक्काच बसला . रूग्णालय आणि मेडिकलला चक्क टाळे ठोकण्यात आले होते . आणि तिकडे एकही रुग्ण किंवा व्यक्ति नसल्याचे आढलूण आल्याचेही नातेवाईकांकडुन सांगण्यात आले .या बाबत डॉ. तांबोली यांना फ़ोन केल्यानंतर ते रुग्णालयाच्या ठिकाणी आले मात्र त्यानी सीसीटिव्हीत रेकॉर्डींग होत नसल्याचे त्यांनी थातुरमातुर आणि उडवाउडवीची उत्तरे दिल्याचेही नातेवाईकांनी सांगितले . 



या सर्व प्रकरणात काहीतरी कालेबेरे असल्याचा संशय आल्याने हॉस्पिटलच्या सीसीटिव्ही फूटेजची तपासणी करुन संबंधित डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर चालवणा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा , त्याच्या वैद्यकिय पदव्या रद्द करुन भविष्यात त्यांना कोणत्याही स्वरुपात वैद्यकिय प्रँकटिस करु न देण्याची मागणी या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या तक्रारीत केली आहे . तर मनविसे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे यांनीही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवुन संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाईची मागणी करण्यात आली असून संबधितांवर आता महापालिका प्रशासन काय कारवाई करते हे पहावे लागेल .


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...