खासगी रूग्णालयामधून शासकीय आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची माहिती लेखी स्वरुपात देण्याची मागणी

 




ठाणे - महापालिका क्षेत्रातील खाजगी रूग्णालयाधून शासकीय आरोग्य योजनांच्या झालेल्या अंमलबजावणीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. येत्या ३ ऑगस्ट पासून विधिमंडळ अधिवेशन सुरु होत असून महत्वाच्या अशा कोरोनाच्या मुद्यावरही चर्चा होणार आहे. 


कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना राबवल्या, कशी अंमलबजावणी केली याचाही आढावा घेतला जाणार असून महापालिका हद्दीत एकूण किती खासगी हॉस्पिटल आहेत ? किती रूग्णालयं कोविड रूग्णालयं म्हणून घोषित केली आहेत, आजवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य उपचार किती रूग्णांवर झाले याची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी तसंच खाजगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णांची लूट केल्याच्या अनेक तक्रारी असून पालिकेनं अशा किती रूग्णालयांना आजपर्यंत नोटिसा दिल्या आहे आणि बिलांबाबत ऑडीटरने केलेल्या चौकशीविषयी सविस्तर खुलासा द्यावा, बेड उपलब्ध असूनही गरीब रूग्णांना दाखल करून घेतलं नाही अशाही तक्रारी असून त्याबाबत महापालिकेनं काय कारवाई केली. 


कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. या शासकीय उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत, विशेषतः रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांपर्यंत पोहचावी यासाठी पालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. गरजू नागरिकांसाठी ‘आयुष्मान भारत’ किंवा ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ अशा योजना असून सर्वच हॉस्पिटल मध्ये लागू होणे गरजेचे आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये या योजना आहेत त्या योजनेचा बोर्ड, त्याची माहिती हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे का ? कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना या शासकीय योजनांची माहिती देण्याची काय व्यवस्था केली आहे याची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...