कल्याण - डोंबिवलीतील कोविड सेंटर ,कोविड प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
कल्याण : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळेसह आणि कल्याण- डोंबिवलीतील कोविड सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले . मुंबई महानगर क्षेत्र परीसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृ्ष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.
कोरोना संकटकालात महाराष्ट्र शासन खंबीर आहे . वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्याप्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्याच्या सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.