मुरबाड तालुक्यात टोमॅटोची शेती फुलली श्रीगणेशाच्या मुख दर्शनाने
मुरबाड : तालुक्यातील विढे ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या मालकीच्या जागेमध्ये टोमॅटोची शेती लावणारे शेतकरी संजय आत्माराम गायकवाड यांनी पावसाच्या आगमनाच्या सुरुवातीलाच विविध भाजीपाल्या सह भेंडी ,काकडी, फुलवर ,घोसाळी , मिरची दोन एकर क्षेत्रफळापैकी एक एकर क्षेत्रफळा मध्ये टोमॅटो या रोपाची लागवड आपले साथीदार वसंत मारुती सोनवणे , दिलीप भगवान धुमाळ शिवळे, तसेच गणपत उर्फ बाप्पा चौधरी विढे गाव यांच्या सहकार्याने टोमॅटोची शेती फुलवली आहे.
परिसरामध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे त्यातच आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांची ही टोमॅटोची शेती निसर्गाच्या विविध रंगानी पाने फुलांनी नटलेली असतानाच टोमॅटो या फळांमध्ये साक्षात श्रीगणेशाचे दर्शन घडून आले त्यामुळे परिसरात गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. श्रावण महिन्यात लवकरच श्री गणेशाचे आगमन होणार असल्याने जगावरील व आपल्या देशावर आलेले कोरोना विषाणूचे महासंकट दूर होण्याचे संकेत या टोमॅटो गणेश प्रतिकृती मधून दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील वारकरी संप्रदाय व गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे .तरी भक्त भाविकांनी घरीच राहून या टोमॅटो गणेश प्रतिकृतीचे दर्शन घ्यावे असे आवाहन प्रगतशील शेतकरी संजय गायकवाड यांनी जनतेला केले आहे.