खोडाळा - विहीगाव रस्ता झाडा  झुडपामुळे धोकादायक ; रस्त्यांवर  दरडी कोसळण्याच्या भिती ...


कसारा : मोखाडा  तालुक्‍यातील खोडाळा -विहीगाव   जोडणाऱ्या  रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे  रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील नागरीकांमधून होत आहे. पावसाळ्यानंतर दरवर्षी खोडाळा- विहीगाव  घाटात झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसून येत नाही. या भागातील कारेगाव आश्रम शाळा  जवळ रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडुपे वाढल्यामुळे वाहन चालवताना पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहन चालकांची फसगत होते.मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.


 खोडाळा रस्त्यांवर  असणाऱ्या कारेगाव,वाकडपाडा,उधळे जोगलवाडी यांना मोखाडा  येथे ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तर विहीगाव जवळील अशोका धबधबा पाहण्यासाठी , पर्यटक  या ठिकाणी सतत येत असतात. या घाट रस्त्यावर असलेली काटेरी झुडपांमुळे येथे अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे या परीसरातील झाडे झुडुपे काढून टाकण्याची मागणी , प्रवाशांमधून होत आहे.



या रस्त्यावरुन नियमित प्रवास करतो. या रस्त्यावरील धोकादायक झाडे पाहुन वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन चालवावे लागते. या रस्त्यावर वाहतुक जास्त असल्याने धोकाही अधिक आहे. संबंधीत विभागाने वेळेत लक्ष देऊन धोकादायक झाडांची छाटणी  करावी. 


-दुर्वास निरगुडे संरपच विहीगाव 


पावसाळ्यापुर्वी या मुख्य रस्त्यावरील धोकादायक झाडे तोडणे गरजेचे बनले आहे. या रस्त्यावरील वाहतुक या ना त्या कारणाने धोकादायक झाली आहे.या बाबतअनेक वेळा पत्र व्यवहार करून प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.  


- प्रदीप वाघ  पंचायत समिती मोखाडा  सदस्य. 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...