कल्याण - डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील तापाचा दवाखाना जोंधळे महाविद्यालयात स्थलांतरीत
कल्याण : शास्त्रीनगर रुग्णालयात असणारा महानगरपालिकेचा तापाचा दवाखाना ( फिवर क्लिनिक ) दिनांक २९ जुलै २०२० पासून जोंधळे महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासना तर्फे देण्यात आली आहे .
महानगरपालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणुन घोषित केल्यापासुन या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे .त्यामुळे हा तापाचा दवाखाना जोंधळे महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे फिवर ओपीडी मधून आलेल्या संश यित कोविड रुग्णांची जोंधळे महाविद्यालयात विनामुल्य अँन्टिजेन टेस्ट देखील करण्यात येणार असल्याची माहितीही महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे .