वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठोकलं महावितरणच्या कार्यालयाला टाळं


ठाणे - वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. कोरोनाच्या काळात एकीकडे हाताला काम नसताना वाढीव वीज बिल आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात लोकमान्य नगर येथील महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली. यावेळी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून गेट बाहेर महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता ४ महिन्यांपासून घराबाहेर पडू शकली नाही. तर बेरोजगारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या संकटकाळातच विज वितरण महामंडळाने सर्वसामान्य विज ग्राहकांचे विज मिटर रिडींग न घेता सरासरी विज देयक पाठवून दिली. वहन आकार आणि प्रत्येक युनिट मागे आकार वाढविण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असून हे आकार त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...