माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल जाहीर ! यंदाही मुलींची बाजी!


मुरबाड - मार्च  २०२० रोजी घेण्यात आलेल्या माध्यमिक  शालांत परिक्षेचा  (SSC)   ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यामध्ये मुरबाड तालुक्याचा निकाल ९५ .९३ % लागला आहे या निकालामध्ये सर्वात जास्त मुलींनी बाजी मारल्याचे चित्र  दिसून येत आहे.तालुक्यात सेमी इंग्रजी माध्यमातून प्रथम येण्याचा मान सौ निर्मला बळीराम तोंडलीकर कर विद्यालयाची जिज्ञासा जयवंत  हरड हिने ९६ . ६० % गुण मिळवुन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर इंग्रजी माध्यमातून  एस.व्ही शेट्टी इंग्लीश मेडीयम स्कूल किशोर  शाळेची तेजस्वीनी संतोष भोईर हिला ९६% गुण मिळवुन  प्रथम आली असल्याने दोघींचेही तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे.


 निर्मला बळीराम तोंडलीकर  विद्यालयाच्या सेमी माध्यमातून द्वितीय क्रमांक साहिल वालिंबे ९५ .२० % तर तृतीय क्रमांक योगिता पाटील ९४ % २० ,तसेच सौ निर्मला बळीराम तोंडलीकर  विद्यालयाचा एकूण  निकाल ९९ % १२ लागला आहे. त्या पाठोपाठ विद्या मंदिर हायस्कूल शिवळेचा निकाल ९७ . २० %  लागला आहे. जिद्नासा ने मिळविलेल्या तीच्या या यशाचे श्रेय तिने तिचे आईवडील व घरत अभ्यासिका व तीच्या  शाळेतील शिक्षकवृंदाना दिले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...