भारतात पहिल्यांदाच होणार iPhone 11 ची निर्मिती
अमेरिकन कंपनी ऍपल Apple भारतात पहिल्यांदा त्यांचं प्रमुख मॉडेल असणाऱ्या iPhone 11ची निर्मिती manufacturing iphone 11 करणार आहे. त्यासाठी चेन्नई येथे फॉक्सकॉन प्लांटमध्ये तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनी iPhone SE 2020 हे मॉडेलही भारतात बनवण्याबाबत विचार करत आहे. हे मॉडेल भारतात बनल्यास ते बंगळुरु येथील विस्टर्न प्लांटमध्ये तयार केलं जाईल.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी ट्विट करत याबाबत घोषणा केली. 'Apple कंपनीच्या टॉप मॉडेलपैकी एक असणारा iPhone 11 भारतात बनणार आहे. मेक इन इंडियासाठी हे चांगले संकेत आहेत.' असं गोयल म्हणाले.