१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शहर मनसेचे प्रयत्न
मुरबाड - कोरोना लॉकडाऊन काळात शाळा-कॉलेजेस पूर्णपणे बंद आहेत. मुरबाड तालुक्यातील इयत्ता १० वी व १२वीच्या बोर्डाच्या महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून खाजगी कोचिंग क्लासेसला मर्यादीत विद्यार्थ्यांना घेऊन सशर्त परवानगी दयावी या मागणी साठी मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश देसले व शहर सचिव तुषार म्हसे यांनी पुढाकार घेतला असून नगर पंचायतीकडे लेखी निवेदन सादर करून लक्ष वेधले आहे.
अन्यायग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांचे प्रश्न , कामगारवर्गाची पिळवणूक,शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्याच्या संदर्भात मुरबाड शहर मनसेने सदैव पुढाकार घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा बंद असल्याने मुरबाड मधील १०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणीक नुकसान होत आहे.या बाबत मनसे कडे अनेक पालकांनी गाऱ्हानीं मांडल्या मुळे किमान काही खाजगी कोचिंग कलासेस कोरोनाच्या महत्वाच्या नियमावली निदेर्शीत करून सशर्त सुरू करावेत.या आशयाचे लेखी पत्र मुरबाड नगर पंचायतीचे मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांना मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश देसले व सचिव तुषार म्हसे यांनी सादर केले आहे.सध्या मुरबाड मध्ये सम-विषम फॉर्म्युला वापरून अत्यावश्यक गरजांची दुकाने सुरू असून मनसेच्या मागणीला नगर पंचायतीने हिरवा कंदील दाखविल्यास दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात शैक्षणिक नुकसान टळणार आहे.