२५ ऑगस्ट रोजी पाच न्यायमूर्तींसमोर सुनावणी घेण्याबाबत निर्णय होणार..
ठाणे : मराठा आरक्षण प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात समाधानकारक बाब झाली, आरक्षणावर कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Video Conferencing द्वारे सुनावणी होत आहे मात्र त्यात पुरावे सादर करण्यास अडचण येत आहे त्यामुळे तात्काळ सुनावणी घेण्याची घाई करू नये अशी मागणी आज आपल्या वतीने करण्यात आली. त्यावर मा.न्यायालयाने मराठा समाजाच्या बाजूने निकाल दिला.
विरोधकांनी मागणी केली की, राज्य सरकारने त्वरित नौकरभरती घ्यावी व ज्यामध्ये मराठा आरक्षण नसावे. त्यावर राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, आज कोरोनाच्या महामारीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि ४ मे २०२०च्या शासन निर्णयानुसार नौकरभरती सध्या होऊ शकणार नाही.
पाच न्यायमूर्तींसमोर सुनावणी घेण्यात यावी या आपल्या मागणीवर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात येणार आणि ०१ सप्टेंबर पासून मुख्य सुनावणी सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने विविध विधिज्ञांमार्फत बाजू मांडल्या गेली तर माझ्यावतीने जेष्ठ विधीज्ञ पी.एस.नरसिंहा व अँड.संदीप देशमुख यांनी बाजू मांडली.आज आपल्या आरक्षणावर कुठलीही स्थगिती मिळाली ही अतिशय समाधानकारक बाब आहे, यामुळे आपले विद्यार्थी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात.