आमदार प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने विनामूल्य पोर्टेबल ऑक्सीन मशीन सेवेचा शुभारंभ


ठाणे -  शाखा तिथे दवाखाना या आमदार प्रताप सरनाईकांच्या उपक्रमांतर्गत विनामूल्य पोर्टेबल ऑक्सीजन मशीन सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच सरनाईक यांनी शाखा तिथे दवाखाना उपक्रम लोकांसाठी सुरू केला आहे. आता त्याअंतर्गत ही ऑक्सीजन मशीन सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन ही पोर्टेबल ऑक्सिजन मशीन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


कोरोना रुग्णांना २४ तास ऑक्सिजनची गरज असून ज्या रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाही त्यांना घरीच पोर्टेबल ऑक्सिजन मशीन उपलब्ध करुन दिल्यास रुग्णाचा प्राण वाचू शकतो. तसंच शाखा तिथे दवाखाना या अंतर्गत औषधंही नागरिकांना विनामूल्य दिली जात आहेत. सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत तपासणी करणाऱ्या मेडिकल अधिकाऱ्याला संपूर्ण पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत. 


कोरोनाबाधित रुग्णांना विनामूल्य पोर्टेबल ऑक्सिजन मशीनची आवश्यकता असल्यास लोकमान्य नगर प्रदीप खाडे यांच्याशी  ९८२०३९१११२ , रामचंद्र गुरव, ९८९२१७९८७५ , वर्तकनगर-समता नगर अनिल भोईर यांच्याशी ९९८७८६८६८६ , शिवाईनगर- येऊर, कोकणीपाडासाठी कुंदन घोसाळकर यांच्याशी ९९६७७४७५७७ , वसंत विहार, पवार नगर मनोज नारकर ९८३३३७८२०७ गांधी नगर, नळपाडा स्याट्रिक आयझ्याक यांच्याशी  ९३२३०१७६५९ , चिराग नगर, कापुरबावडी विलास मोरे ७९०००५०६४८  तर घोडबंदरसाठी साजन कासार यांच्याशी   ९९२०७५६०५३  या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...