'मदर इंडिया' चित्रपटातील जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे ८६व्या वर्षी  निधन... 


 'मिस्टर एक्स इन बॉम्बे', 'मदर इंडिया', 'सन ऑफ  इंडिया ' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. कुमकुम यांच्या निधनाची बातमी नावेद जाफरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. 



वाईट गोष्ट म्हणजे २०२० साली बॉलिवूडने अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. अभिनेता इरफान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत, जगदीप आणि आता  अभिनेत्री कुमकुम यांच्या निधनामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. कुमकुम यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्यांचे अनेक चित्रपट हीट देखील झाले आहे. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...