शहापुर तालुक्यामधील कोरोनाचा चढता आलेख उतरता उतरेना;कोविड सेंटर मध्ये रुग्णांची हेळसांड.


डोळखांब: ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आपत्तीव्यवस्थापनाचा कोरोना आटोक्यात आल्याचा दावा खोटा ठरला आहे.तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकूण रुग्णसंख्या ७४५ वर पोहोचली आहे.तालुक्यातील वासिंद हे ठिकाण कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून वासींद मधील रोजची वाढणारी कोरोना बाधितांची संख्या नागरिकांच्या चिंतेचा कारण ठरत आहे.


आरोग्य विभागाच्या अहवालानुसार दि.२८ जुलै रोजी नव्याने २५ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.शहापुर तालुक्यात आतापर्यंत ७४५ रुग्णांमधील ५२२ रुग्ण बरे झालेले आहेत.तसेच ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १९८ इतकी आहे.अलगीकरण कक्षातील व्यक्तींच्या संख्येत देखील दिवसेंदिवस बेसुमार वाढ होत आहे.शहापुर नगरपंचायत व शहापुर ग्रामीण मधील संस्थात्मक कोरोंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या १०९६ इतकी तर होम कोरोंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या २७९४ इतकी झाली असून एकूण संख्या ३८९० एवढी आहे.कोरोनामुळे आजवर शहापुर तालुक्यातील २५ व्यक्ती मृत पावल्या असून हा आकडा नक्कीच विचार करायला लावणारा आहे.



शहापुर तालुक्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आसनगाव येथील जोंधळे कॉलेज मध्ये ठाणे ग्रामीण मधील पहिले कोविड सेंटर उभारण्यात आले होते.परंतु तालुक्यातील आपत्तीव्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे लवकरच हे कोविड सेंटर हाऊसफुल झाले.आजमितीला या कोविड सेंटर मध्ये रुग्णांची हेळसांड सुरू झाली असून कोविड सेंटरमधील रुग्ण सोशल मीडियावर आवाज उठवत आहेत.कोविड सेंटरमध्ये स्वच्छतागृहे तसेच वार्ड बाहेर जागोजागी कचरा साठला असून स्वच्छतेचा प्रचंड अभाव दिसून येत आहे.रुग्णांना पोषकआहार वेळच्यावेळी दिला जात नसून जो आहार पुरविला जातो तोदेखील निकृष्ट दर्जाचा असून त्यासोबत दिली जाणारी फळे सुद्धा सडकी असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले आहे.एकूणच कोविड सेंटर मधील रुग्णांची हेळसांड व तालुक्यातील वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.लोकप्रतिनिधींनी यावर मौन बाळगले असून तालुक्यातील ही गंभीर परिस्थिती पाहता त्यांनी वेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे.


 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...