ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जप्त केला बनावट मास्कचा साठा


ठाणे - ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी व्हीनस कंपनीच्या बनावट मास्कचा साठा जप्त करून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर अनिवार्य आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन व्हीनस कंपनीचे बनावट मास्क विकले जात असल्याची माहिती पोलीस निरिक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून लोअर परळ इथे एक व्यक्ती बनावट मास्कची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं समजले. 


त्यानुसार सापळा रचून पोलीसांनी टेम्पोतून आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीत व्हीनस कंपनीचे साडेहजार एन ९५ बनावट मास्क, व्हॉल्व्ह असलेले व्ही ४१० व्ही चे ६,८०० मास्क आणि प्लास्टीकचे रिकामे पाऊच १० हजार असा एकूण २१ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. व्हीनस कंपनीच्या अधिका-यांनी मास्कची तपासणी केली असता ते बनावट असल्याचं निष्पन्न झालं. जप्त केलेले मास्क हे निकृष्ट दर्जाचे असून अशाप्रकारचे मास्क वापरणे आरोग्यास धोकादायक आहे. कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारचे बनावट मास्क अजून कोठे विक्री केले जात आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...