टिटवाळा येथील नागरिकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व मोफत किराणा सामान वाटप
टिटवाळा: २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष विजय दशेकर व समाजकल्याण न्यासचे अध्यक्ष धर्मसेवक डॉ.सोन्यादादा पाटील यांच्या विशेष सहकार्याने मांडा टिटवाळा परीसरातील नागरीकांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण तसेच ६० महिलांना धान्य वाटप,अंकुर बालविकास केंद्र आणि आईची सावली ह्या अनाथाश्रमात शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेसाठी लागणारी भांडी वाटप करण्यात आली.
ह्यावेळी हातमाग महामंडळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) तथा जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण प्रकाशजी पाटील ,नवनिर्वाचित ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा(राज्यमंत्री दर्जा) सुषमाताई लोणे,शिवसेना महिला भिवंडी लोकसभा संघटक कलाताई शिंदे,शिवसेना कल्याण महिला जिल्हा संघटक विजयाताई पोटे,आमदार शांतारामजी मोरे ,नगरसेवक सुनिलजी वायले, तालुका संपर्कप्रमुख विष्णुजी चंदे,उप-शहरप्रमुख कीशोरभाई शुक्ला,संभाजी ब्रिगेड महानगरप्रमुख प्रभाकरजी भोइर,छावा संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष अक्षयजी भोईर आणि शिवसेना महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.