गणेशपुरीत जागतिक निसर्ग संरक्षण दिना निमित्त वृक्षारोपण व संकल्प
वज्रेश्वरी : २८ जुलै रोजी जागतिक निसर्ग संरक्षक दिनानिमित्त गणेशपुरी येथील संघर्ष प्रतिष्टानचे अध्यक्ष सुनिल देवरे यांनी त्यांच्या परिवारासह वृक्षारोपण केले.व निसर्ग संरक्षण चा संकल्प केला. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील संघर्ष प्रतिष्ठन या संस्थेच्या मार्फत दरवर्षी पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण केले जाते या वर्षी सुध्दा या संस्थे तर्फे निसर्ग संरक्षण व पर्यावरण समतोल राखण्या चा संकल्प करण्यात आला, आज जागतिक निसर्ग संरक्षण दिना निमित्ताने व या परिसरात वरुण राजाने चांगली हजेरी लावल्याने त्याचा सदुपयोग करून आज या परिवाराने वृक्षारोपण करून संकल्प केला आहे.
"निसर्गाचे रक्षण व्हावे आणि निसर्ग सुंदर व आरोग्यदायी व्हावा या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही पावसाळ्यात संघर्ष प्रतिष्ठान अंतर्गत ग्रीन अर्थ या प्रोजेक्ट च्या माध्यमातून २५९ वृक्षालागवडीचे लक्ष ठेवले असून ते आम्ही लवकरचं पूर्ण करणार आहोत अशी माहिती संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल देवरे व ग्रीन अर्थ प्रोजेक्ट हेड दीपक पूजारी यांनी यावेळी दिली.