अघई परिसरात कोरोनाचा फैलाव,परीसरात कोरोनाचे रुग्ण वाढले.
अघई: शहापूर तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना, तालुक्यातील खेडोपाडी कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची डोके दुःखी वाढत आहे. अघई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत अनेक गावपाडे येत आहेत,त्याच बरोबर परीसरातील गावामध्ये कोरोना रुग्ण सापडत असल्याने,आरोग्य यंत्रणेची ताराबंळ उडत आहे.
शहापूर तालुका विस्तृत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या आरोग्य केंद्रावर प्रचंड ताण येत आहे. रुग्ण कोविड सेंटर मधे दाखल करणे, नातेवाईकांना विलगिकरण कक्षात ठेवणे अशी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. आरोग्य यत्रणेला ग्रामपंचायतीकडून मदत होत असून, रुग्ण सापडलेल्या ठिकाणी फवारणी त्याच बरोबर कोरोना बाधित क्षेत्रात नागरिकांना प्रतिबंध इत्यादी कामात ग्रामपंचायतीकडून आरोग्य यंत्रणेला मदत होत आहे.