मंदिरे खूली करा ; कल्याण डोंबिवलीतही भाजपचे घंटानाद आंदोलन
कल्याण : राज्यातील मंदिरे पुर्ववत खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवलीतही ठिक ठिकाणी हे आंदोलन केलेले पहावयला मिळाले. डोंबिवलीमध्ये श्री गणेश मंदिर संस्थानांमध्ये सरचिटणीस आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणारी मंदिरे संपुर्ण देशभर खुली करण्यात येत आहेत . महाराष्ट्र सरकारकडेही सातत्याने मंदिरं खुली करण्याबाबत मागणी केली जात आहे . मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी भाजपतर्फे संपुर्ण महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन करण्यात आल्याची माहीती भाजप प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली डोंबिवली प्रमाणे कल्याणातही आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पुर्वेतील तिसाई देविच्या मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. कुंभकर्णापेक्षाही गाढ़ झोपलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहीती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. तसेच कल्याण डोंबिवलीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या ...