भाजपाच्या नगरसेविका अंजनी पाटील यांनी भरले गणपती विसर्जन मार्गातील खड्डे
वाडा- नगर पंचायतीच्या वार्ड क्रमांक-५च्या भाजपाच्या नगरसेविका अंजनी पाटील यांनी स्वखर्चाने गणेश विसर्जन मार्गातील खड्डे भरले.
वाडा शहरातील राम मंदिर ते सिद्धेश्वरी विसर्जन घाटा पर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली होती. अनंत चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने विसर्जनासाठी गणेश भक्तांना त्रास होवू नये याची खबरदारी घेवून पाटील यांनी स्वतः आज रस्त्यावर उभे राहून खड्डे भरून घेतल्याने. विसर्जनासाठी जाणा-या गणेश भक्तांना चांगला रस्ता तयार करण्यात आला.