शहापूरात कोविड-19 आयुष टास्कफोर्सच्या निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरू ....



शहापुर : कोविड-१९आयुष टास्क फोर्स महाराष्ट्र शासन आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूरातही निमा आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिकला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी डॉ. संगीता गुजराथी यांचे आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक सुरू झाले आहे. त्यामुळे ह्या शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


 कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांच्या आरोग्याचे भान ठेवून कोविड सोबतच इतर आजारांवर व्यक्तिंची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी निमा आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. त्यानुसार ह्या  संकल्पनेचे गुरुवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे हस्ते  डिजिटल ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. राज्यात ४०० क्लिनिक सुरू करण्यात आले असून शहापुर तालुक्यातही अश्या प्रकारचे डॉ.  संगीता गुजराथी  यांच्या  आयुर्वेदिक  इम्युनिटी क्लिनिकला परवानगी मिळाल्याने शुक्रवार पासून हे आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. 


   ह्या निमा आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रश्नावली द्वारे सर्व माहिती घेऊन प्रकृती परिक्षण आणि इम्युनिटी स्कोअर निश्चित केला जाणार आहे.  त्यानुसार आयुर्वेदिक औषधासह  सोबतच दैनंदिन जीवन पद्धतीतील बदल, योगाभ्यास, व्यायाम, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीने ह्या क्लिनिक मध्ये २ महिन्यात ४ वेळा येणे आवश्यक राहिल. तसेच ना नफा ना तोटा ह्या तत्वावर ही सेवा असून सुरुवातीलाच नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. तर औषधे बाहेरून विकत घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे  तालुक्यातील जनतेने  कोविड १९च्या लढ्यातील एक भाग म्हणून आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ह्या इम्युनिटी क्लिनिकचा लाभ घ्यावा असे आवाहन निमा महाराष्ट्र राज्य शाखेतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकातून व  माहिती देतांना डॉ.  संगीता गुजराथी यांनी केले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...