राष्ट्रीय अध्यक्ष पदी राहुल गांधी यांची निवड करण्याची मागणी
ठाणे - अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटच्या सदस्या, महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या सचिव सुमन अग्रवाल यांनी दि.२४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे होणाऱ्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत युवा नेतृत्व राहुल गांधी यांची कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी सर्व सदस्यांनी करावी असे अवाहन केले आहे.
सुमन अग्रवाल यांनी सांगितले कि राहुल गांधी यांची कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करणे यासाठी गरजेचे आहे की ते लोकप्रिय व सक्रिय नेता आहेत. त्यामुळे पक्षबांधनी व राष्ट्रहितासाठी ते देशाच्या किंवा समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात सहज पोहचून भारतीय लोकशाही व राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. म्हणून सर्व सदस्यानी राष्ट्रीय अध्यक्ष पदी राहुल गांधी यांची निवड करण्याची मागणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या सचिव सुमन अग्रवाल यांनी केले आहे.