वळ ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम ; कोरोनाकाळात सेवा बजावणा-यांचा कोरोना योध्दा म्हणुन गौरव


भिवंडी : तालुक्यातील विकसीत ग्रामपंचायत म्हणुन ओळख निर्माण केलेल्या वळ ग्रामपंचायत येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरपंच हर्षदा अरुण भामरे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व पक्षीय सामाजिक संस्था-क्रिडा मंडळ,डाॅक्टर,पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका व कर्मचा-याना कोरोना योध्दा म्हणुन गौरविण्यात आले.


कोरोनाच्या प्रादुर्भावात गेली ५ महिने ग्रामपंचायतीचे कर्मचारी समवेत गावातील सर्व लहान थोर मोठ्यांनी आपला जीव धोक्यात घालुन कोरोना सारखा आजार नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाचा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने  कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपुर्ण गांव एकत्र आले असुन कोरोनाला गावातुन हद्दपार देखील केले त्यामुळे सरपंच हर्षदा अरुण भामरे व उपसरपंच राजन मढवी समवेत सर्व सदस्यांनी सर्व ग्रामस्थांचे मनापासु‌न आभार देखील व्यक्त केले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...