अघई विभागातील युवा किर्तनकार ह.भ.प श्री भानुदास महाराज भोईर यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान. 


अघई - कोविड-१९ मध्ये वारकरी व कीर्तनकार असलेले व मुन्सिपल बँकेचे संचालक आपत्तीमध्ये अघई विभागातिल गाव पाड्या वर आर्सेनिक अल्बम गोळ्या त्याच बरोबर गरीब गरजूना अन्न धान्य यांचे वाटप करत महामारीचे भीषण सकंट असताना स्वताच्या जीवाची पर्वा न करता नागरीकांच्या सुरक्षित ते साठी अविरत कार्यरत राहिले. 


अत्यावश्यक सेवेतील कामगारांना कामावार जाण्यासाठी अडचनी  येत होत्या प्रत्येक वेळी कामगारा -कर्मचारी यांच्या पाठीशी राहून त्यांना आधार देण्याचे काम भानुदास भोईर करत होते.प्रत्येक वेळी वेळ प्रसंगी स्वता रस्त्यावर उतरून परिस्थितीशी दोन हात करत होते. महामारीच्या काळात परप्रांतीय मंजूर मुंबई नाशिक महामार्गावरून गावाकडे जाण्यासाठी पायी प्रवास करत होते. त्या वेळी त्यांना बिस्किट, अन्न, पाणी यांचे वाटप करत होते.स्वताची पर्वा न करता सामाजिक भान जपत त्यांनी केलेल्या महामारीच्या काळात केलेल्या कार्याची समर्पण चॉरीटेबल ट्रस्ट कडून दखल घेवुन कोविड-१९ योद्धा सन्मान पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...