भिंवडी कृषी उत्पन्न बाजार समीती संपात सहभागी
पडघा : केंद्र सरकारने काढलेल्या एका जाचक अध्यादेशाला विरोध करण्यासाठी भिंवडी कृषी उत्पन्न बाजार समीतीने एकदिवसीय लाक्षणिक संपात संपात सहभाग घेऊन निषेध नोंदवला.
५ जुन २०२० रोजी केंद्र सरकारने काढलेल्या नियमन मुक्ती आध्यादेशास विरोध करण्यासाठी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी वर्गाला शासन सेवेत समाविष्ट करणेसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २१ आँगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेल्या देशव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संपात भिंवडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांसह संपात सहभागी झाले होते.यावेळी विवीध सर्व व्यवहारासह तालुक्यातील उपबाजार आवार आस्नोली येथील शेतीमालाचे व कोन येथील मेंढ्या बकरी खरेदी विक्री व्यवहार १०० टक्के बंद ठेवले होते.