BRAKING NEWS : महाड शहरात मोठी दुर्घटना;काजळ पुरा भागातील एक पाच मजली इमारत कोसळली ..
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात काजळ पुरा भागातील एक पाच मजली इमारत कोसळली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १०० जण अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आठ दहा वर्षे जुनी इमारत कळत असून इतक्या कमी वर्षांत ही इमारत कोसळली. स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणा व एन. डी.आर. एफ.ची टीम घटना स्थळी दाखल झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. सदर इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रायगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार “महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजळपुरा भागात ५मजली इमारत आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पडली आहे. यामध्ये ४५ते ४७फ्लॅट होते. सुमारे ७०ते ८० रहिवाशी त्यामध्ये अडकल्याची शक्यता आहे. १५ लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून त्यांना उपचारा करीत पाठविले आहे”, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सदर इमारतीला आठ वर्ष झाले असून अचानक ही पाच माजली इमारत कोसळण्याने या इमारतीचे बांधकाम हे किती निकृष्ट दर्जाचे होते हे दिसून येते. गेल्या काही वर्षांत महाड आणि रायगड जिल्ह्यातील काही भागाला निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटाला सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी भर पावसात मुंबई गोवा महामार्गावरील मोठा पूल अचानक कोसळला भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.अनेकांचे जीव गेले होते. नुकतेच ह्या जिल्ह्याने वादळाचा तडाखा सहन केला होता. पूर परिस्थिती निर्माण होणे ही दरवर्षांची बाब असून आता ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.