राज्यातील  देवस्थाने आणि धार्मिक संस्थाने खुली करण्यासाठी भाजपाचे  घंटानाद आंदोलन...

 



शहापुर-  राज्यातील  देवस्थाने आणि धार्मिक संस्थाने खुली करण्यासाठी शहापूरात भाजपा शहरच्या वतीने शनिवारी  सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यातील  मंदिरे उघडण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहापुरात भाजपा शहापुर शहरच्या वतीने शहापुरातील  लक्ष्मीनारायण मंदिरा समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 



 आंदोलना दरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. ह्यावेळी  भाजपा शहापुर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, जेष्ठ नेते अशोक इरनक, काशिनाथ भाकरे, शहापुर शहर प्रभारी प्रशांत फुले, अल्पसंख्याक आघाडी शहापुर तालुका अध्यक्ष साजिद शेख,शहापुर शहर युवा अध्यक्ष आकाश अधिकारी,  आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...