टोकावडे नाका ते स्मशानभुमी रस्त्ता कधी होणार; गावकरी रस्त्याच्या प्रतिक्षेत...


मुरबाड : टोकावडे बाजारापेठ ते स्मशानभुमी हेदवली या रस्त्यावरून जाणे येणे म्हणजे स्थानिकांना  तारेवरची कसरत करावी लागते.यामुळे गणपती बाप्पाचे विसर्जन खड्यातून पायवाट काढत करावी लागली.टोकावडे नाक्यावरुन हेदवली रस्ता पुर्णपणे उखडून गेला असून या रस्त्यावर  मराठी शाळा, शारदा महाविद्यालय, फाॅरेस्ट कार्यालय, टोकावडे  पोलिस ठाणे हेदवलीगाव, एकलेशीआई आदिवासी वाडी हे सरकारी रुग्णालय हे नागरिक दररोज ये जा करतात हा रस्ता चार ते पाच वर्षांपूर्वी चा असून संबंधित बांधकाम खाते मुरबाड यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 



गुरुवारी गणपती बाप्पाचे विसर्जन खड्यातून पायवाट काढत झाले आहे.हा रस्ता जर दिवाळीच्या आत केला नाहीतर टोकावडे नाक्यावर मोठे  आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन मुरबाड खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश पवार व शिवसेना विभागप्रमुख राजेश भांगे यांनी केले आहे.


 


 


 


 


 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...