मंदिरे खुली करण्यासाठी मुरबाड मध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन; महाआघाडी  सरकारचा केला निषेध  


मुरबाड - कोरोना महामारी संकटात सगळीकडे लाँकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीत शाळा, काँलेज,सह उद्योग, धंदे,कारखाने , कार्यालये,ते मंदिरे, देवस्थाने ही बंद ठेवण्यात आली होती. परंतु सध्यस्थितीत  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी  होत आहे.उद्योग धंद्यांसाठी माणसे हळूहळू हिम्मत करून घराबाहेर पडु लागली आहेत. अशातच सर्वत्र  मंदिरे देवस्थाने बंद आहेत. मंदिरे ही  माणसाला माणसिक आधार  देत असतात  त्यामुळे  ती तात्काळ खुली करावीत यासाठी आज भाजपा च्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मंदिरांसमोर घंटानाद आंदोलने करण्यात आली.


 त्याच पार्श्वभूमीवर मुरबाड शहरासह संपूर्ण मुरबाड तालुक्यातील  मंदीरे सुरु करा या मागणीसाठी अनेक धार्मिक संस्था व देवस्थानांच्या वतीने  आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व खासदार कपिल पाटील  व भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व आमदार किसनजी कथोरे यांच्या सूचनेनुसार मुरबाड शहरातील हनुमान मंदिर, राममंदिर, शंकर मंदिर, जैन मंदिर, जोगेश्वरी मंदिर इ. ठिकाणी  घंटानाद आंदोलन करून या आंदोलनाला पाठिंबा देऊन मंदिरे सुरू करण्याची मागणी राज्यसरकारकडे करण्यात आली .



 या आंदोलनात  भाजपा मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव , शहर अध्यक्ष सुधीरभाई तेलवणे,  जिल्हा महिला अध्यक्षा शीतलताई तोंडलीकर, मुरबाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा छायाताई चौधरी,उपनगराध्यक्षा अर्चनाताई विशे, जिल्हा सरचिटणीस  नितीन मोहपे सर ,माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी , माजी नगरसेवक मोहन दुगाडे ,दिलीप देशमुख , संतोष( माऊली) चौधरी, वार्ड अध्यक्ष बाळू  तेलवणे इत्यादी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...