श्रीराम मित्रमंडळाचे संस्थापक अनिल मानिवडे यांचे वाढदिवसानिमित्त आरोग्य साहित्य वाटप.


वासिंद - येथील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात सतत कार्यरत असलेल्या श्रीराम मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष, अनिल मानिवडे यांनी आपला वाढदिवस शुक्रवारी करोनाच्या पार्श्र्वभूमीवर साधेपणाने साजरा केला. वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांच्या तर्फे शहापूर तालुक्यातील, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व कोरोना योध्दा समाज सेवकांना १०० पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे.


 शनिवारी  वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी तेथिल डॉक्टर, आशाताईं व कर्मचाऱ्यांना २५ पीपीई किटचे वाटप केले. तसेच आरोग्य केंद्र सॅनिटाइझ करण्यासाठी स्वयंचलित फवारणी पंप  देण्यात आले. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात ५० पीपीई कीट देण्यात येणार असल्याचे मानिवडे यांनी सांगितले. वासिंद आरोग्य केंद्रात सर्व डॉक्टर, आशा वर्कर्स व कर्मचाऱ्यांनी मानिवडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले. यावेळी श्रीराम मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...