महापालिकेच्या फिरत्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद



ठाणे - महापालिकेच्या फिरत्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट मधील गणेश भक्तांसाठी महापालिकेनं फिरती गणेश विसर्जन व्यवस्था सुरू केली आहे. त्यानुसार आज दीड दिवसाच्या गणपतींचे या व्यवस्थेमध्ये विधीवत विसर्जन करण्यात आलं. 


हॉटस्पॉट मधील गणेश भक्तांना दुस-या ठिकाणी जाऊन विसर्जन करावे लागू नये यासाठी महापालिकेनं फिरती विसर्जन व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या या व्यवस्थेचा फायदा होणार आहे. फिरत्या विसर्जन व्यवस्थेमार्फत दीड दिवसांप्रमाणेच ५दिवसांच्या आणि दहा दिवसाच्या गणपतींचेही विसर्जन करण्यात येणार आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...