भिवंडी-वाडा रस्त्याची प्रचंड दुरावस्था;राजकीय पक्षांची बघ्याची भूमिका, ठेकेदाराचे उखल पांढरे


वाडा: भिवंडी-वाडा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यामुळे नित्याचीच वाहतूक कोंडी व लहान मोठे अपघात होत होते.यातून नागरिकांची सुटका होऊन गणपती सणा पूवी रस्ता वाहतूकीस योग्य व्हावा म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने कुडूस नाक्यावर रास्ता रोको आंदोलन छेडून सावॅजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता गणपती सणा पूवी वाहतूकीस योग्य करण्याचे लेखी आश्वासन घेतले. परंतु आंदोलन संपताच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याने हा विषय बाजूला राहिल्याने या वषीही गणपती बाप्पाचे आगमन खड्डे तुडवतच झाले. याचे राजकीय पक्षांना काहीही सोयर सुतक नसल्याने थातुरमातुर खड्डे भरून ठेकेदाराने मात्र उखल पांढरे करून घेतले.
           
 वाडा-भिवंडी -मनोर या महामार्गावरील डाकिवलीफाटा ते वाडा या २०कि.मी.अंतराच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या दुरूस्तीचा ठेका जय भारत कंस्टक्शन कंपनीला ३कोटी रूपयांना देण्यात आला असून या मध्ये त्यांनी उन्हाळा व पावसाला या दोन्ही मोसमात रस्त्याची दुरूस्ती करायची आहे. परंतु सद्यस्थितीत सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम हे निकूष्ट दजाॅचे केल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून दोन खासदार, तीन आमदारांचा हा तालुका मात्र रस्त्यांसह अनेक सोयी सुविधा पासून कोसो मैल दूर आहे.



 भिवंडी-वाडा-मनोर रस्ता बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर सरकारने सुप्रीम इन्फास्टक्चर या कंपनीला दिला होता. मात्र १०वषॅ लोटल्या नंतरही रस्त्याचे काम पूणॅ झालेले नाही. १६कि.मी.अंतरावर वनविभागाची हद्द असल्याने  तेथील रस्ता दुुुपदरीच आहे. देहजे, पिंजाळ या नद्यां वरील पुलांची कामे आज पयॅत अपूर्णच आहेत. वाडा-भिवंडी-मनोर महामार्गाचे काम निकूष्ट झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता खड्डेमय होतो व दरवषी दुरूस्तीवर करोडो रुपये खर्चहोतात. या वषीही तीच अवस्था झाली असून सावॅजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आंदोलन छेडले.त्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सावॅजनिक बांधकाम विभागा कडून (दि.२१)पर्यंत रस्ता वाहतूकीस योग्य करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून सद्य स्थिितीत या रस्त्याची चालन झाली असून त्याला कोणी वालीच नाही.


 "या महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम नियमित सुरू असून रस्त्यावर पाणी साचत असल्याने कामात अडथळा निर्माण होतआहे. परंतु  शंभर टक्के काम पूणॅ करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत".
                                                                                                                       -     ए.एम.बरसट


(शाखा अभियंता)


बांधकाम विभाग वाडा


"रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र रस्त्याचा पाया मजबूत नसल्याने एका जागेवरील खड्डा भरला की लगेच दुस-या ठिकाणी खड्डा पडतो आहे. 21 तारखेपर्यंत सर्व खड्डे भरले होते. त्याची व्हिडिओ क्लिप ही आम्ही बनवली आहे. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पडत आहेत. तरीही रस्ता लवकरच लवकर सुस्थितीत करण्यात येईल"


विवेक पवार 
  ठेकेदार


 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...